लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये प्रश्नोत्तरी, सायन्स पीपीटी आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धा उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांना आपल्यातील कलागुणांचे सादरीकरण आणि ज्ञान कौशल्य सिद्ध करता यावे यासाठी या स्पर्धा घेण्यात आल्या.सदननिहाय सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नोत्तरी स्पर्धा घेण्यात आली. सातवी व आठवीचा एक आणि नववी व दहावीचा एक अशा समुहात स्पर्धा पार पडली. क्विझ मास्टर अमोल चन्नूरवार यांनी विद्यार्थ्यांना ज्ञानात्मक प्रश्न विचारले. स्कोअरर आणि टाईम किपर म्हणून माधुरी राजे व संध्या सुब्रम्हण्यम यांनी काम पाहिले. संचालन दिवा माखासना व हर्ष खसाळे यांनी केले.सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांमधून पुष्पक सदनाचे वरुण चंदार, अमोलिका वावरे, वंशिका बाजोरिया, शर्विका वाघे यांनी प्रथम स्थान प्राप्त केले. विक्रांत सदनातील ओवेस सैयद, अमेय कासेटवार, राधेय तोहर, आस्था जिरजे यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. वर्ग नऊ आणि दहामधून पुष्पक सदनातील श्रृती भेंडारकर, नम्रता नारलावार, श्रीमय दीक्षित व कश्यप शाह यांनी प्रथम स्थान मिळविले. गजराज सदनातील वेद जोशी, शांतनू वाद्दी, पंचम प्रभुणे आणि चिन्मय साँभे आणि विक्रांत सदनातील राशी अग्रवाल, यश घोडेराव, तुषार कुंटावार, संस्कार गावंडे यांनी द्वितीय स्थान प्राप्त केले.नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘स्वास्थ्य के लिये हानीकारक इलेक्ट्रॉनिक कचरा’ या विषयावर सायन्स पीपीटी स्पर्धा घेण्यात आली. परिक्षक म्हणून जेडीआयईटीच्या कॉम्प्यूटर सायन्सचे प्रा. शेळके, प्रा. पोपट, प्रा. मनक्षे लाभले होते. या स्पर्धेत पुष्पक सदनाचे श्रीमय दीक्षित, मीनाक्षू गंडेचा, विनाती नथवानी, श्रृती भेंडारकर यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. गजराज सदनातील ऋतुजा बाहेती, श्रेया बाजोरिया, श्रेया पंडित, कशीश जेसवानी हे द्वितीय स्थानी राहिले.विद्यार्थ्यांना आपल्यातील कलागुण सिद्ध करता यावे आणि अभिनय क्षमता ओळखता यावी यासाठी सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आली. सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रपट कलावंत व नेता, तर सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी हास्य कलावंत व राष्ट्रीय नेता हा विषय ठेवण्यात आला होता. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून रूक्साना बॉम्बेवाला, मुग्धा जाजू, प्रज्ञा पोहेकर, मंजू शाहू यांनी काम पाहिले. संचालन सानिका कोलवाडकर व सुनिधी राठोड या विद्यार्थिनींनी केले.वर्ग सहामधून विक्रांत सदनातील सम्यक पिसे याने प्रथम, पुष्पक सदनातील रूद्र वानखडे याने द्वितीय, विक्रांत सदनातील आळंदी भिष्मने तृतीय स्थान प्राप्त केले. वर्ग सातमधून विक्रांत सदनातील अवनिश बोराडे याने प्रथम, याच सदनातील शर्वरी लांजेवारने द्वितीय, तर गजराज सदनातील गौरी शर्मा हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. स्पर्धेसाठी प्राचार्य जेकब दास यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी आयोजनाबद्दल शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा यांनी आयोजकांचे कौतुक केले.
‘वायपीएस’मध्ये विविध स्पर्धा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 23:19 IST