शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
4
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
5
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
6
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
7
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
8
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
9
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
10
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
11
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
12
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
13
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
14
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
15
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
16
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
17
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
18
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
19
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
20
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?

चमेडियानगरात नाचण्याच्या वादातून तरूणाचा खून

By admin | Updated: October 4, 2014 23:32 IST

विसर्जन मिरवणूकीत नाचण्याच्या वादातून झालेल्या भांडणात एका तरूणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. ही घटना येथील चमेडीयानगरात गुरूवारच्या रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.

यवतमाळ : विसर्जन मिरवणूकीत नाचण्याच्या वादातून झालेल्या भांडणात एका तरूणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. ही घटना येथील चमेडीयानगरात गुरूवारच्या रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. धनराज अभिमान पंचारे (२६) रा. डोर्लीपुरा असे मृताचे नाव आहे. डोर्लीपुरा परिसरातील सार्वजनिक उत्सव मंडळाची मिरवणूक निघाली. ही मिरवणूक चमेडीयानगरात पोहोचताच आरोपी शंकर नेवारे (१९) रा. डोर्लीपुरा याने नाचण्याच्या कारणावरून धनराजशी वाद घातला. तरीही धनराज नाचायला तयार नसल्याने शंकरने त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच संतापाच्या भरात मोठा दगड उचलून त्याने धनराजच्या डोक्यात घातला. त्यानंतर पुन्हा तोच दगड उचलून त्याने धनराजवर जोरदार हल्ला चढविला. त्यामध्ये त्याच्या तोंडाला आणि डोक्याला गंभीर दुखापत होवून धनराज जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल मदने, शहर ठाणेदार दिलीप चव्हाण हे पथकासह तेथे दाखल झाले. त्यांनी मृतदेहाची पाहणी करून पंचनामा केला. तसेच मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता पाठविला. त्यानंतर धनराजचा भाऊ राहूल याच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात मारेकरी शंकर नेवारे याच्याविरूध्द भादंवि ३०२ कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. (स्थानिक प्रतिनिधी)