शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
2
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
3
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
4
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
5
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
6
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
7
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
8
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
9
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
10
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
11
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
12
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
13
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
14
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
15
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
16
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
17
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
18
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
19
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
20
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!

तंटामुक्तीसाठी आता तरुणांचा पुढाकार

By admin | Updated: February 1, 2015 23:06 IST

शांततेतून समृद्धीकडे हे ब्रीद असलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत राज्यभर तरुणांचा सक्रिय सहभाग वाढावा व भविष्यात सामाजिक व राजकीय क्षेत्रात क्रियाशील व सृजन

पुसद : शांततेतून समृद्धीकडे हे ब्रीद असलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत राज्यभर तरुणांचा सक्रिय सहभाग वाढावा व भविष्यात सामाजिक व राजकीय क्षेत्रात क्रियाशील व सृजन नेतृत्व निर्माण व्हावे, या हेतूने विविध शाळा व महाविद्यालयात वाद-विवाद, वक्तृत्व व निबंध स्पर्धा आयोजित करण्यावर शासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता तंटामुक्तीसाठी राज्यातील तरुणाई सरसावणार आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानांतर्गत राज्यातील २७ हजारांवर ग्रामपंचायतींपैकी आतापर्यंत तब्बल १७ हजारांवर गावे तंटामुक्त करण्यात मोहिमेला यश आले आहे. त्यामुळे राज्यातील गावागावात एक लोकचळवळ भक्कमपणे उभी राहिली आहे. या अभियानात तरुणांचा जास्तीत जास्त सहभाग वाढावा या हेतूने आता शाळा व महाविद्यालयातून वाद-विवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धेचे व्यापक प्रमाणात आयोजन करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहे. त्यानुसार तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत आता लवकरच शाळा, महाविद्यालयात सदर स्पर्धा रंगणार आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेला शासनाच्या गृह विभागाच्यावतीने सन २००७-०८ पासून प्रारंभ झाला आहे. मोहिमेच्या पहिल्याच वर्षी २३२८ गावे तंटामुक्त घोषित करण्यात आली. या पैकी २५२ गावांना विशेष शांतता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मोहिमेच्या दुसऱ्या वर्षी अर्थात सन २००८-०९ मध्ये २८९१ गावे तंटामुक्त पुरस्कारासाठी पात्र ठरली. तर त्यापैकी २६५ गावांनी विशेष शांतता पुरस्कार पटकाविला. मोहिमेच्या तिसऱ्या वर्षी म्हणजे २००९-१० मध्ये ४२६४ गावे तंटामुक्त होवून यापैकी ३६२ गावे विशेष शांतता पुरस्कारासाठी पात्र ठरली. मोहिमेच्या चौथ्या वर्षी २०१०-११ मध्ये ३८२४ गावे तंटामुक्त झाली. तर २७१ गावे विशेष शांतता पुरस्कारासाठी पात्र ठरली. मोहिमेच्या पाचव्या वर्षी म्हणजे २०११-१२ मध्ये २४७१ गावे तंटामुक्त होवून यापैकी ७५ गावांनी विशेष शांतता पुरस्कार पटकाविला. मोहिमेच्या सहाव्या वर्षी २०१२-१३ मध्ये १७४१ गावे तंटामुक्त झाली. तर ४७ गावांनी विशेष शांतता पुरस्कार पटकाविले. अर्थात आतापर्यंत राज्यातील १७६६५ गावे तंटामुक्त होवून त्यापैकी १२७० गावांनी विशेष शांतता पुरस्कार पटकाविले आहे. विशेष शांतता पुरस्कार पटकाविणाऱ्या गावांनी २०० पैकी १९० किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केले, हे विशेष. यंदा मोहिमेचे सातवे वर्ष सुरू आहे. तंटामुक्त मोहिमेत सहभागी गावांनी १ मे रोजी ग्रामसभा घेऊन आपले गाव तंटामुक्त घोषित करण्याच्या दृष्टीने घोडदौड सुरू केली आहे. या मोहिमेसाठी आता तरुणाईचा सक्रिय सहभाग मिळणार असल्याने या मोहिमेची गती वाढण्यास मदत होणार आहे. राज्यातील विविध शाळा, महाविद्यालयात तंटामुक्तीवर आधारित विविध स्पर्धांच्या आयोजनामुळे तंटे निवारण्याच्या पद्धतीचे आकलन युवावर्गाला होणार आहे. त्यातून गावागावात शांतता प्रस्तापित करण्यास फायदा होणार आहे. ग्रामस्थांमधूनही चांगला प्रतिसाद लाभण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)