शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

पबजी गेमच्या नादापायी यवतमाळ जिल्ह्यात युवकाची गळफास लाऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 21:01 IST

नेर तालुक्यातील पिंप्री मुखत्यारपूर येथे गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. तो पबजी गेमच्या नादी लागला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: नेर तालुक्यातील पिंप्री मुखत्यारपूर येथे ऑनलाईन पब्जी खेळाने एका युवकाचा बळी घेतला. सदर युवकाने गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास राहत्या घरी गळफास लाऊन आत्महत्या केली. निखिल पुरुषोत्तम पिलेवान (२३) असे मृत युवकाचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून तो मोबाईलवर ऑनलाईन पब्जी गेम खेळत होता. या ऑनलाईन खेळामुळे त्याचे मानसिक संतुलन बिघडले. त्यातूनच निखिलने गुरुवारी सकाळी राहत्या घरी गळफास लावला. यात त्याचा मृत्यू झाला. यावेळी त्याचे आई, वडील व भाऊ शेतात गेले होते. घरी निखिल एकटाच होता. एकटा असल्याची संधी साधून त्याने गळफास घेतल्याची माहिती त्याचा भाऊ मिथेश यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीतून दिली. निखिलचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. ऑनलाईन खेळामुळे निखिलचा बळी गेल्याने ग्रामीण भागातही पब्जी गेम पोहोचल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तुर्तास अकस्मात मृत्यूची नोंद घेतली.सात महिन्यांपूर्वी पुणे येथून परतलागेल्या सहा-सात महिन्यांपूर्वी निखिल पुणे येथून गावात परतला होता. त्याला पब्जी गेमचे वेड होते. दिवसातून १६-१६ तास तो ऑनलाईन पब्जी गेम खेळत होता. आई, वडील व मोठ्या भावाने त्याला कित्येकदा समजाविले. मात्र पब्जीमुळे त्याची मानसिकता बदलली होती. त्यातूनच त्याने गुरुवारी आत्महत्या केली. जिल्ह्यातील पब्जी गेमचा निखिल पहिला बळी ठरला आहे. 

टॅग्स :PUBG Gameपबजी गेमSuicideआत्महत्या