शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाई जाणून घेतेय वाघाची ‘चाल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 06:00 IST

प्रामुख्याने परिसरातील महाविद्यालयीन तरुण-तरुणींना वाघाच्या संचाराची त्याचे अस्तित्व ओळखण्याची संपूर्ण माहिती पुरविली जात आहे. या कार्यशाळांमध्ये मानद वन्यजीव रक्षक डॉ. रमजान विराणी हे तज्ज्ञ मार्गदर्शन करीत आहेत. यातील पहिली कार्यशाळा मोहदा येथे सरदार पटेल महाविद्यालयात पार पडली.

ठळक मुद्देटिपेश्वर अभयारण्य परिसर : वाघाच्या संचार क्षेत्रात संघर्ष टाळण्यावर भर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : टिपेश्वर अभयारण्य म्हणजे सध्या सर्वाधिक वाघांचे संचारक्षेत्र बनले आहे. वाघांची संख्या वाढत असून परिसरत वन्यजीव-मानव संघर्षाच्या घटनाही वाढत आहे. हा संघर्ष टाळण्यासाठी आता या परिसरातील तरुण वाघाच्या जगण्याची, वागण्याची, वावरण्याची चालरीत समजून घेत आहेत. त्यासाठी वाईल्ड लाईफ ट्रस्ट आॅफ इंडिया आणि जपान टायगर अँड एलिफंट फंड या संस्थांच्या सहाय्याने गावोगावी कार्यशाळा घेतल्या जात आहेत.प्रामुख्याने परिसरातील महाविद्यालयीन तरुण-तरुणींना वाघाच्या संचाराची त्याचे अस्तित्व ओळखण्याची संपूर्ण माहिती पुरविली जात आहे. या कार्यशाळांमध्ये मानद वन्यजीव रक्षक डॉ. रमजान विराणी हे तज्ज्ञ मार्गदर्शन करीत आहेत. यातील पहिली कार्यशाळा मोहदा येथे सरदार पटेल महाविद्यालयात पार पडली. त्यानंतर दुसरी कार्यशाळा पारवा येथे झाली. तर आता डॉ. विराणी स्वत: प्राणीशास्त्राचे प्राध्यापक असलेल्या पांढरकवडा येथील शिवरामजी मोघे महाविद्यालयात होणार आहे. याशिवाय, वणी, झरी, मुकुटबन आदी गावांतील तरुणांनाही मार्गदर्शन केले जाणार आहे.वन्यजीवांचे अस्तित्व कसे ओळखावे, वाघाचे केंद्रस्थान कोणते, मानव-वन्यजीव संघर्षाची कारणे, त्यावरील उपाययोजना आदींबाबत विद्यार्थी स्वयंस्फूर्त माहिती जाणून घेत आहेत. मोहदा येथील कार्यशाळेला महाविद्यालयाचे संचालक डॉ. राधेश्याम चौधरी, प्राचार्य गोरलेवार, प्रा. सूरज चौधरी, प्रा. इंगळे आदी उपस्थित होते.वाघाशी अनेकदा आमना-सामनाटिपेश्वर परिसरातील अनेक विद्यार्थ्यांचा शाळा-महाविद्यालयात जाताना वाघाशी आमना-सामना झाला आहे. हे अनुभव विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत बोलून दाखविले.

टॅग्स :Tipeshwar Sancturyटिपेश्वर अभयारण्यTigerवाघ