शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रीचा धागा घट्ट करण्यासाठी सरसावली तरुणाई

By admin | Updated: August 7, 2016 01:20 IST

मोबाईलमुळे जग मुठीत आलं. व्हॉट्सअ‍ॅप, टिष्ट्वटर, फेसबुकवर दररोज मित्र जुळतात. ही हायटेक मैत्री मित्रत्वाची भावना...

 युवांची गर्दी : बाजारपेठ सज्ज, शुभेच्छापत्र, बँडसह विविध वस्तूंची रेलचेल यवतमाळ : मोबाईलमुळे जग मुठीत आलं. व्हॉट्सअ‍ॅप, टिष्ट्वटर, फेसबुकवर दररोज मित्र जुळतात. ही हायटेक मैत्री मित्रत्वाची भावना वृद्धिंगत होण्यापूर्वीच तुटते. यातील काही मोजकेच मित्र आपल्या जवळचे होतात. आपल्याशी जुळलेला प्रत्येक मित्र आयुष्याच्या कठीण प्रसंगी आपल्यासोबत असावा म्हणून प्रत्येक तरुण मैत्री जपतो. मैत्रीच्या या धाग्याला अधिक घट्ट करण्यासाठी फ्रेंडशिप डे साजरा करण्यात येतो. पाश्चिमात्य संस्कृतीमधील हा दिवस साजरा करण्याचे फॅड अलिकडे वाढत चालले आहे. रविवारी साजरा होत असलेल्या मैत्रीदिनाकरिता बाजारपेठही सज्ज झाली आहे. मी माझ्या आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला किंमत देतो कारण जे चांगले आहे ते साथ देतील आणि जे वाईट असतील ते अनुभव देतील याप्रमाणे अनेक सुंदर संदेश लिहिलेली शुभेच्छापत्रे बाजारात आली आहेत. मित्रत्वाची भावना, प्रियकर आणि पे्रयसीची मैत्री, जीवलग मित्रांची मैत्री यासारखे विविध भावार्थ सांगणारी शुभेच्छापत्रे बाजारात आहेत. या शुभेच्छापत्रांना खरेदी करण्यासाठी बाजारात तरुण आणि तरूणींची गर्दी उसळली आहे. महाविद्यालयीन तरुणांपर्यंत मर्यादित असलेली मैत्रदिनाची संकल्पना आता शाळेपर्यंतही पोहोचली आहे. यासाठी खास फ्रेंडशिप बँड आणि अंगठ्या बाजारात आल्या आहेत. शाळा, महाविद्यालयापुढील दुकानांमध्ये हे फ्रेंडशिप बेल्ट, अंगठ्या सहज उपलब्ध होतात. प्रत्येकाच्या पॉकेटमनीला झेपेल इतक्या स्वस्त दरात हे बेल्ट उपलब्ध होतात. प्लास्टिक आणि धाग्याच्या रूपात, तसेच धातूमध्ये बनविलेले हे बँड खरेदी करण्यासाठी शाळा, महाविद्यालयापासून उच्चशिक्षित विद्यार्थ्यांपर्यंत सर्वच गर्दी करताना दिसत आहेत. शुभेच्छा गॅलरीमध्ये तरुण आणि तरुणींचा पे्रमभाव लक्षात घेता मैत्रदिनाचे गिफ्ट बाजारात आणले आहेत. परफ्यूम, टॉईज, कोलाज फ्रेम, ज्वेलरीचा यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे. यासाठी शहारातील दुकाने सजली आहेत. पूर्वी या दुकानांमध्ये पाच ते सहा दिवस आधीपासूनच युवकांची गर्दी असायची. आता फ्रेंडशिप डेच्या दिवशीच गर्दी पाहायला मिळते. (शहर वार्ताहर)