पुसद : खरिपाच्या सुरुवातीला पावसाने दडी मारली. शेतकऱ्यांवर दुबार व तिबार पेरणीची वेळ आली. आता कपाशी, तूर, सोयाबीन शेतात डोलू लागले. मात्र संकट शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयारा नाही. ऐन फुलोऱ्यात आलेल्या सोयाबीनवर पिवळ्या मोझॅक या विषाणूजन्य रोगाचे आक्रमण झाले आहे. माळपठारात तूर, ज्वारीला उकरी लागली आहे. पुसद कृषी उपविभागात सोयाबीन पेरा मोठ्या प्रमाणात आहे. शेतातील सोयाबीन सध्या फुलोऱ्यावर आहे. याच वेळी पिवळ्या मोझॅक या विषाणुजन्य रोगाने आक्रमण केले आहे. ओलीतातील ४० टक्के तर कोरडवाहू क्षेत्रातील ६० टक्के सोयाबीनवर रोगाचे आक्रमण दिसत आहे. पांढरी माशी सोयाबीन पानांचे रस शोषण करित असल्याने पिकांची वाढ खुंटत आहे. पाने पिवळी पडत असूनगळत आहेत. प्रादूर्भाव वाढत असून फुले व शेंगा गळण्याच्या मार्गावर आहेत. पुसद तालुक्यातील सावंगी, लिंबी, •भोजला, पाळोदी परिसरात यचा अधिक प्रादूर्भाव दिसून आला आहे. सध्याचे वातावरण या रोगाच्या प्रसारास अनुकुल असून सोयाबीनची उत्पादन क्षमता ५० टक्क्याने घटण्याची शक्यता आहे. पुसद तालुक्यातील माळपठार •भागात गेल्या पंधरवड्यात पेरणी अटोपली. दोन तीन दिवस पाऊस आल्याने पिके अंकुरली. परंतु पुरेश्या पावसाअभावी चार इंचाच्यावर पिकांची वाढ झाली नाही. यावर्षी शेतकऱ्यांना निसर्गाच्या संकटाचा सामना शेवटपर्यंत करावा लागतो की काय, अशी स्थिती आहे. (वार्ताहर)
सोयाबीनवर पिवळ्या मोझॅकचे आक्र मण
By admin | Updated: August 3, 2014 23:39 IST