शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळची नवी ओळख ‘वाघांचा जिल्हा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 22:01 IST

कापसाचा जिल्हा, शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा या ओळखींच्या पलिकडे यवतमाळला आता ‘वाघांचा जिल्हा’ असे नवे बिरुद चिकटण्याची शक्यता आहे. टिपेश्वर अभयारण्य आणि अभयारण्याच्या लगतच्या क्षेत्रात वाघांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे राज्यभरातील पर्यटकांचे लक्ष यवतमाळने वेधून घेतले आहे.

ठळक मुद्देनिसर्ग पर्यटनाला वाव : पांढरकवडा वनक्षेत्रात वाढले वाघ

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कापसाचा जिल्हा, शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा या ओळखींच्या पलिकडे यवतमाळला आता ‘वाघांचा जिल्हा’ असे नवे बिरुद चिकटण्याची शक्यता आहे. टिपेश्वर अभयारण्य आणि अभयारण्याच्या लगतच्या क्षेत्रात वाघांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे राज्यभरातील पर्यटकांचे लक्ष यवतमाळने वेधून घेतले आहे. सोमवारी साजऱ्या होत असलेल्या जागतिक व्याघ्र दिनाच्या निमित्ताने जिल्ह्याच्या व्याघ्रवैभवावर एक नजर.वाघांच्या अधिवासाबाबत, संख्येबाबत जनजागृती वाढविण्यासाठी २९ जुलै हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो. नेमकी याच जागृतीची यवतमाळ जिल्ह्यात मात्र उणीव आहे. पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्यात वाघांच्या अधिवासासाठी अनुकूल नैसर्गिक वातावरण असले तरी स्थानिक नागरिकांमध्ये त्याबाबत जागृती नाही. शासनाच्या दुर्लक्षामुळे हे अभयारण्य अद्यापही व्याघ्र प्रकल्प घोषित होऊ शकले नाही.प्रत्यक्षात अभयारण्य आणि अभयारण्याच्या आजूबाजूच्या परिसरात जवळपास २९ वाघांचा वावर असल्याची माहिती या भागातील वन्यजीव अभ्यासक डॉ. राजू विराणी यांनी दिली. यंदाच्या हंगामात तर मुंबईपासून पुण्यापर्यंतच्या पर्यटकांनी टिपेश्वरला भेट दिली. वाघांची संख्या सतत वाढत असल्यामुळे आता जिल्ह्यात निसर्ग पर्यटन, कम्युनिटी टुरिझमला मोठा वाव निर्माण झाला आहे.स्थानिकांना रोजगाराची संधीटिपेश्वर अभयारण्यात पूर्ण वाढ झालेले चार वाघ, सहा सबअ‍ॅडल्ट वाघ (दीड ते दोन वर्ष वय), आणि सात बछडे असे १७ वाघ आहेत. शिवाय तीन वाघ इतरत्र ‘मायग्रेट’ झाले आहेत. तर अभयारण्याच्या बाहेर पांढरकवडा वनक्षेत्रात जवळपास १२ वाघ वावरत असल्याची माहिती वन्यजीव अभ्यासक डॉ. राजू विराणी यांनी दिली. मात्र अवैध जंगल तोड, अनिर्बंध चराई, अतिक्रमण याबाबींमुळे जंगलांवर ताण वाढत आहे. या परिस्थितीत स्थानिक लोकांना वन्यजीव संरक्षण व संवर्धन याबाबत प्रशिक्षण दिल्यास निसर्ग पर्यटनातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Tigerवाघ