शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
....तोपर्यंत तपास यंत्रणा वकिलांना समन्स बजावू शकत नाहीत; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
3
आता उगाच उठून सोशल मीडियावर काहीही बोलता येणार नाही! 'या' देशाने इन्फ्लुएन्सर्सबाबतीत घेतला मोठा निर्णय
4
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
5
खिशाला कात्री! स्मार्टफोन महाग होणार? AI मुळे तुम्हाला आता जास्त पैसे मोजावे लागणार
6
१ कोटी रुपयांचं घर घेण्यासाठी तुमची मिनिमम सॅलरी किती असली पाहिजे? पाहा काय म्हणताहेत एक्सपर्ट्स
7
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
8
Shri Swami Samartha: घरातील देवांची मूर्ती, प्रतिमा यातील चैतन्य कसे ओळखावे? उपासना कशी वाढवावी? वाचा
9
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
10
घर घ्यायचंय? फ्लॅट घेताना स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचा खर्च किती येतो? कुठे होईल पैशांची बचत
11
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
12
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
13
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
14
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
15
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
16
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
17
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
18
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
19
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
20
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग

खासदार निधीतून १० कोटी रुपये देऊनही रखडले यवतमाळचे स्टेडियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2021 05:32 IST

विजय दर्डा यांनी दिला निधी : प्रशासकीय नाकर्तेपणाचा कळस

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आदिवासीबहुल यवतमाळ जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार व्हावेत. त्यांना येथेच चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण मिळावे. हॉकी, फुटबॉल, क्रिकेट यासारख्या खेळांना वाव मिळावा, या हेतूने भव्य स्टेडियम उभारण्यासाठी लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी आपल्या खासदार विकास निधीतून १० कोटी रुपये दिले होते. इतका भरीव निधी देऊनही निव्वळ प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे हे स्टेडियम चार वर्षांपासून रखडले आहे. या प्रकरणाची फाइल काही महिन्यांपासून मंत्रालयात पडून आहे.

यवतमाळ तालुक्यातील डोर्ली-डोळंबा येथे हे स्टेडियम उभारले जाणार होते. ३ मे २०१६ रोजी विजय दर्डा यांनी स्वत: तत्कालीन जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंह यांची भेट घेऊन १० कोटी रुपयांच्या निधीचे पत्र त्यांना सोपविले होते. प्रशासकीय मंजुरी, जागा उपलब्ध करून देणे आपल्याच हाती आहे, आपण ते तातडीने करून घेऊ, असा शब्द सिंग यांनी दिला होता. मात्र, त्यानंतर फाइल जिल्हाधिकारी कार्यालयस्तरावर फिरत राहिली. 

आज चार वर्षे लोटली. ना प्रशासकीय मंजुरी मिळाली, ना जागा उपलब्ध झाली. नंतरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांमार्फत यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव मंत्रालयात पाठविला होता. तत्कालीन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी सर्व संबंधितांची मंत्रालयात बैठक घेऊन हे प्रकरण तातडीने मार्गी लावण्याचे आदेश दिले होते. मात्र, ती फाइल आजही मंत्रालयात धूळखात पडून आहे. पालकमंत्री संजय राठोड यांनी १० डिसेंबर २०२० रोजी येथे घेतलेल्या आढावा बैठकीत ही बाब उघड झाली.

क्रीडा खात्याचीही उदासीनताप्रशासकीय मंजुरी नसल्याने तसेच जागा उपलब्ध करून न दिल्याने केंद्रावरून दर्डा यांनी दिलेला १० कोटींचा निधी वितरित झाला नाही. क्रीडा खात्याच्या अधिकाऱ्यांनी तर कमालीची उदासीनता दाखविली. क्रीडा अधिकाऱ्यांनी स्टेडियमसाठीची जागा महसूल विभागाकडून क्रीडा खात्याकडे वळती व्हावी, यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही.

विजय दर्डा यांनी स्टेडियमसाठी १० कोटी रुपये मंजूर केेले. मात्र, कामाला प्रशासकीय मंजुरी न मिळाल्याने व जागेचा विषय मार्गी न लागल्याने केंद्र शासनाकडून निधी प्राप्त झाला नाही.- मुरलीनाथ वाडेकर, जिल्हा नियोजन अधिकारी, यवतमाळ

चार वर्षांपूर्वीचे १० कोटींचे बजेट आता ४० कोटींवर गेले आहे. एवढा निधी मिळेल, याची शाश्वती नाही. त्यामुळे जेवढे पैसे मिळतील, त्यात काही बाबी वगळून स्टेडियमसाठी नव्याने नियोजन केले जाईल.     - एम.डी. सिंह, जिल्हाधिकारी, यवतमाळ