शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळच्या रेशीम शेतीचे मॉडेल राज्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 12:53 IST

जिल्ह्यात अत्यंत कमी पाण्यात शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. हाच आदर्श राज्यभरातील शेतकऱ्यांपुढे ठेवण्यासाठी महाराष्ट्रात महारेशीम अभियान राबविले जाणार आहे.

ठळक मुद्दे संचालनालयाचा निर्णयराज्यात महारेशीम अभियान राबविणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात अत्यंत कमी पाण्यात शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. हाच आदर्श राज्यभरातील शेतकऱ्यांपुढे ठेवण्यासाठी महाराष्ट्रात महारेशीम अभियान राबविले जाणार आहे. रेशीम लागवडीसाठी उत्सूक असलेल्या शेतकऱ्यांच्या १९ डिसेंबरपर्यंत नोंदी घेतल्या जाणार आहे.जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्ह्यात रेशीम लागवडीवर भर दिला. विशेष मोहिम राबविली, यामुळे लागवड क्षेत्रात मोठी वाढ नोंदविण्यात आली. ज्या शेतकऱ्यांनी रेशमाची लागवड केली, त्यांचे उत्पन्न वाढण्यास सुरूवात झाली आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्याचे लक्षात आल्यानंतर रेशीम संचालनालयाने राज्यात महारेशीम अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. त्याच्या जाणीवजागृतीसाठी रेशीमरथ गावोगावी फिरणार आहे.नागपुरातून या अभियानाला सुरूवात झाली. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात रेशीम लागवड वाढविण्यासाठी संचालनालय विशेष प्रयत्न करणार आहे. यवतमाळ, अमरावती आणि बुलढाणा या जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याण्याचे आदेश रेशीम संचालनालयाने दिले आहे.पिक ाचे सर्वच दृष्टीने संरक्षणरेशीम पीक घेताना शेड उभारण्यासाठी अनुदान दिले जाते. या शेडमध्येच रेशीम कोष तयार करणाऱ्या अळ्या ठेवल्या जातात. शेडमुळे सर्वच प्रकारच्या वातावरणात कोषाचे संरक्षण होते. यामुळे आर्थिक हानी टाळता येते. यामुळे हमखास उत्पादन देणार पीक म्हणून रेशीम कोषाकडे पाहिले जाते.

टॅग्स :agricultureशेती