शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीच्या पथसंचलनात झळकणार यवतमाळचा शिवमसिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 14:00 IST

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत होणाऱ्या पथसंचलनात यवतमाळचा शिवमसिंग दीपकसिंग दुधाने हा विद्यार्थी झळकणार आहे.

ठळक मुद्देप्रजासत्ताक दिन परेडग्रुप कमांडरसाठी धडपड

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : प्रजासत्ताक दिनी दिल्लीत होणाऱ्या पथसंचलनात यवतमाळचा शिवमसिंग दीपकसिंग दुधाने हा विद्यार्थी झळकणार आहे. गु्रप कमांडर होण्यासाठी त्याने प्रयत्न सुरू केल्याने तो अग्रस्थानी राहिल्यास नवल वाटू नये. जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तो ग्रुप कमांडर देखील बनेल.यवतमाळातील अतिशय सामान्य कुटुंबातील शिवमसिंग दुधाने कला द्वितीय वर्षाला शिक्षण घेतो. हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या (प्री आर.डी.) शिबिरामधून त्याची दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रीय प्रजासत्ताक शिबिरासाठी निवड झाली आहे. तो यवतमाळ येथील नानकीबाई वाधवाणी कला महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. महाविद्यालयाकडून वेळोवेळी मिळालेले प्रोत्साहन आणि सहकार्याच्या भवरवशावर त्याने अमरावती विभागीय शिबिरातून सोलापूर येथील राज्यस्तरीय शिबिरासाठी आपले स्थान निश्चित केले. राष्ट्रीय सेवा योजनेतून शिस्त, स्वयंशासन, सांस्कृतिक कार्याचे धडे घेतलेल्या शिवमसिंगने मागे वळून पाहिले नाही. शिवमसिंग हा यवतमाळच्या जयहिंद क्रीडा मंडळाचा कबड्डी खेळाडू आहे. मंडळाचे अध्यक्ष प्रदीप वानखडे, नव जयहिंद मंडळाचे अध्यक्ष विनायकराव बोदडे आदींच्या मार्गदर्शनात तो तयार झाला आहे.हैदराबाद येथे झालेल्या प्री आर. डी. शिबिरासाठी त्याने झेप घेतली. अर्थात हे शिबिर दिल्ली गाठण्यासाठी परीक्षा घेणारे होते. रासेयो पथकाच्या हैदराबाद शिबिरासाठी महाराष्ट्रातून ५६ मुला-मुलींची निवड झाली होती. यातून सहा मुले आणि सहा मुली अशा फक्त १२ जणांची निवड दिल्ली येथे प्रजासत्ताक दिन पथसंचलनासाठी झाली. त्यातही शिवमसिंगची कामगिरी सरस ठरली. निवड झालेल्या १२ विद्यार्थ्यांमधून तो पहिला आहे. सर्वाधिक गुण घेत त्याने आपले स्थान दिल्ली पथसंचलनासाठी निश्चित केले. संस्थेचे अध्यक्ष जगदीश वाधवाणी, प्राचार्य डॉ.जयंत चतूर, रासेयो कार्यक्रम अधिकारी संजय राचलवार यांचे प्रोत्साहन आपल्यासाठी मोलाचे ठरल्याचे शिवमसिंग दुधाने सांगतो.वेळेचे भान, शारीरिक क्षमता, शिस्त, व्यायाम, तंदुरुस्ती आणि सांस्कृतिक कार्याची पारख करून दिल्ली परेडसाठी निवड केली जाते. या सर्व परीक्षेत शिवमसिंग यशस्वी ठरला. कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची वेळोवेळी पाठीवर पडलेली थाप त्याचा आत्मविश्वास वाढवत गेली. आता त्याने याच जोरावर रासेयो पथकाचा ग्रुप कमांडर होण्याची तयारी सुरू केली आहे. या परेडसाठी दिल्ली येथे १ जानेवारीपासून शिबिर होत आहे. कबड्डी, रनिंग, नृत्य या विषयाची आवड शिवमसिंगला आहे. दिल्ली परेडसाठी निवड होऊन त्याने यवतमाळच्या शिरपेचाात मानाचा तुरा खोवला आहे. दिल्ली गाजविण्याची संधीदिल्ली येथे प्रजासत्ताक पथसंचालनासाठी निवड झालेल्या यवतमाळच्या शिवमसिंग दुधानेला आता दिल्ली गाजविण्याची संधी मिळाली आहे. तो नृत्यकेलेत ही पारंगत आहे. तो पथसंचालनासोबत आपल्या नृत्य कलेच्या माध्यमातून स्वत:बरोबर यवतमाळ व आपल्या कॉलेज नाव चमकवू शकतो.

टॅग्स :cultureसांस्कृतिक