शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
5
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
6
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
7
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
8
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
9
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
10
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
11
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
12
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
13
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
14
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
15
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
16
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
17
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
18
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
19
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
Daily Top 2Weekly Top 5

शाहरूखच्या सिनेमाला यवतमाळचे संगीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 22:11 IST

तो दहावी पास झाला अन् हळूहळू डोळे अधू होऊ लागले... म्हणून आई म्हणाली त्याला सरकारी नोकरी लागली तर बरे होईल. पण शिक्षिका म्हणाल्या तू संगीतच शिक.

ठळक मुद्देयवतमाळचा ‘गौरव’ : अल्पदृष्टीच्या तरुणाची दैदीप्यमान भरारी, संघर्षाला यश

अविनाश साबापुरे ।आॅनलाईन लोकमतयवतमाळ : तो दहावी पास झाला अन् हळूहळू डोळे अधू होऊ लागले... म्हणून आई म्हणाली त्याला सरकारी नोकरी लागली तर बरे होईल. पण शिक्षिका म्हणाल्या तू संगीतच शिक. त्याला आवड नव्हती, तरी शिक्षिकेच्या आग्रहाखातर संगीत विषयासह अकरावीला प्रवेश घेतला. हळूहळू गाणे शिकत गेला.. शिक्षिकेला खबर लागू न देता त्याने बँकेची परीक्षा पास करून बँकेत नोकरीही मिळविली. तर दुसरीकडे आईला थांगपत्ताही लागू न देता तो मुंबईच्या मायानगरीत संगीतकारही बनला!सिनेमाची कथा वाटावी, अशी ही गोष्ट आपल्या यवतमाळातच घडली. अन् आता लवकरच शाहरूख खानच्या नव्या सिनेमाचा संगीतकार म्हणून त्याचे नाव चमकणार आहे... गौरव रमेशचंद्र कांबळे!गौरव यवतमाळात जन्मला, वाढला. अमरावतीत घडला अन् मुंबईत पोहोचला. मायानगरीत गौरव कांबळेचा संगीतकार के. गौरांत झाला. हा प्रवास जरा रोचक आहे. येथील रेणुकानगरीत राहणारे रमेशचंद्र आणि शिला कांबळे यांचा हा मुलगा. दहावीपर्यंत त्याने साधा ‘सा’ही म्हटलेला नव्हता. अकरावीला प्रवेश घ्यायला तो दाते कॉलेजला गेला. तेथे संगीताच्या शिक्षिकेने त्याला संगीत विषय घेण्याची गळ घातली. पास होण्यासाठी सोपे जाईल म्हणून गौरवनेही संगीत विषय घेतला. पुढे बीए झाल्यावर तो अमरावतीच्या व्हीएमव्ही कॉलेजमध्ये संगीतातच एमए करायला गेला. तेथे कल्पेश कांबळे आणि सलीम अमानत अली खान या दोन मुंबईच्या विद्यार्थ्यांशी त्याची मैत्री झाली. घरच्यांना न सांगताच गौरव त्यांच्यासोबत गुपचूप मुंबईला जाऊन यायचा. मुंबई वारीत तो रेडीओ मीरचीवर आरजे म्हणूनही काम करू लागला. उस्ताद अमानत अली खान, गुलाम मुस्तफा खान, रेहान कादरी यांच्या माध्यमातून प्रसिद्ध गायक शफाकत अमानत अली यांच्या ‘फ्यूजन बँड’मध्ये गौरवचीही वर्णी लागली.त्याचवेळी आईच्या इच्छेखातर त्याने बँकेची परीक्षा पास करून नोकरीही मिळविली. सध्या तो यवतमाळच्या स्टेट बँकेत कस्टमर असिस्टंट आहे. आता यवतमाळ-मुंबई अशा दोन्ही तबल्यावर हात मारत त्याच्या जीवनाने छान सुर धरलाय. ‘फ्यूजन’मध्ये काम करता-करता शफाकत अमानत अली यांच्या ‘लेकीन’ अल्बमचे ‘लेकीन वो मेरा ईश्क हैं’ गाणे कंपोज करण्याची संधी गौरवला मिळाली. लगेच त्याने ‘तुही तु हैं’ गाणे कंपोज केले, त्याचे दुसरे व्हर्जनही केले. सोनू निगमशी भेट झाल्यवर तर त्याच्या वाटचालीला बहर आला. अलिकडे गाजलेल्या ‘तु हवीशी मला’ या सोनूच्या मराठी सिनेगीतासाठी अरेंजर म्हणून गौरवने काम केले. वैशाली सामंतच्या गाण्यासाठी अमित राजला असिस्ट केले. प्रसिद्ध गायक केके यांच्या ‘नैय्यो जीना’ अल्बमचे ‘एक मौका दे दे मुझे सॉरी केहने का’ त्यासोबतच ‘फ्रेण्डशिप डॉट कॉम’ सिनेमातील ‘वेड हे लागले मला’ गाणे गौरवने कंपोज केले.गौरव ऊर्फ के . गौरांतची कारकीर्द अद्याप स्थिरस्थावर व्हायची आहे. त्यामुळेच सुरूवातीला काही खाचखळगेही त्याच्या वाट्याला आलेत. ‘रईस’मधील जालिमा, ‘सुलतान’मधील जग घुमिया, ‘बजरंगी भाईजान’मधील आशियाना, तु जो मिला अशी गाणी गौरवने केली आणि त्याला १५-२० हजारात ती नामवंतांच्या नावाने विकावी लागली. आज या गाण्यांनी कोट्यवधीचा धंदा केला. पण या गोष्टी अपरिहार्य असल्याचेही गौरव म्हणतो. पण लवकरच तो स्वतंत्र संगीतकार म्हणून ओळख निर्माण करणार आहे. शाहरूख खानच्या आगामी ‘झिरो’ सिनेमातील एका गाण्याचा संगीतकार म्हणून आपल्याला काम मिळाल्याचे गौरवने सांगितले. सोबतच २३ आॅक्टोबरला त्याचा ‘सुफियाना’ अल्बम रिलिज होतोय.‘लाईक्स’च्या बळावर ४० हजारांची कमाईगौरवने स्वत: कंपोज केलेल्या, इतर संगीतकारांसोबत केलेल्या, स्वत: गायलेल्या गीतांचे ६३ व्हिडीओ यू-ट्यूबवर अपलोड केले आहेत. एकेका गाण्याला लाखो ‘लाईक्स’ मिळताहेत. त्यासाठी यू-ट्यूबने त्याच्याशी करार केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून दर महिन्याला ४० हजार रूपयांचे मानधन मिळते, असे गौरवने सांगितले. एखादा व्हिडीओ फक्त ‘व्ह्यू’ झाला, म्हणजे कुणी पाहिला, तर ५० पैसे मिळतात. तो ‘शेअर’ झाला तर २ रूपये आणि ‘सबस्क्राईब’ झाला तर ५ रूपये असे मानधन मिळत असल्याचेही गौरव म्हणाला.एका गाण्यासाठी २५ दिवस ‘स्विमिंग’‘फ्यूजन’मधील काम पाहून संगीतकार शंकर एहसान लॉय यांनी आपल्या ‘शिवाय’ अल्बममध्ये ‘ओम नम: शिवाय’ हे गीत गाण्यासाठी मुख्य गायक म्हणून गौरवला बोलावले. परंतु, हे संस्कृत गाणे गाण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागल्याचे गौरव म्हणाला. ५ मिनिट १९ सेकंदाचे हे गाणे ‘ब्रेथलेस’ आहे. त्याचा सराव करण्यासाठी शंकर एहसान लॉय यांनी माझ्याकडून चक्क २५ दिवस ‘स्विमिंग’ करवून घेतले. सुरूवातीला तर खूपच घालून पाडून बोलले. मी कंटाळून १५ वेळा यवतमाळला निघूनही आलो. पण गीतकार कविंद्रकुमार यांनी धीर दिला. आणि शेवटी हे गाणे माझ्या आवाजातच साकारले, असे गौरवने सांगितले.यवतमाळातून आॅनलाईन संगीतगौरवच्या घरात कुणालाही गाण्याचा शौक नाही. तरीही संगीतकार म्हणून त्याच्या कारकीर्दीत पहिले १३ हजारांचे हार्मोनियम त्याला आईने दिले. भाऊजींनी गिटार दिले. तर व्हॉईस ओव्हर हे दीड लाखांचे सॉफ्टवेअर कल्पेश कांबळेने दिले. या साधनांच्या बळावर गौरव यवतमाळातच बसून ‘स्काईप’च्या आधारे रेकॉर्डिंग करू शकतो. पण बºयाच गाण्यांसाठी त्याला मोठ्या ‘मिक्सर अरेंजर’ची गरज पडते. हे अडीच लाखांचे उपकरण त्याला सलीम-अमृताभाभी यांनी दिले.