शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

मराठी नाट्य स्पर्धेसाठी यवतमाळची आठ नाटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 21:47 IST

महाराष्ट्र शासनातर्फे दरवर्षी राज्य मराठी नाट्य स्पर्धेचे आयोजन वेगवेगळ्या केंद्रांवर केले जाते. यावर्षी चंद्रपूर केंद्रावर ५८ वी मराठी नाट्य स्पर्धा १५ नोव्हेंबर ते १ डिसेंबरपर्यंत होत असून यासाठी जिल्ह्यातून आठ नाटके जाणार आहेत.

ठळक मुद्दे‘अम्मी’चे दोन दिवस सादरीकरण : पहिला प्रयोग कलाकांचनच्या ‘तन माजोरी’चा

काशीनाथ लाहोरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र शासनातर्फे दरवर्षी राज्य मराठी नाट्य स्पर्धेचे आयोजन वेगवेगळ्या केंद्रांवर केले जाते. यावर्षी चंद्रपूर केंद्रावर ५८ वी मराठी नाट्य स्पर्धा १५ नोव्हेंबर ते १ डिसेंबरपर्यंत होत असून यासाठी जिल्ह्यातून आठ नाटके जाणार आहेत.कलाकांचन संस्थेच्या ‘तन माजोरी’ या नाटकाचा पहिला प्रयोग १९ नोव्हेंबरला होत आहे. प्रेमानंद गज्वी लिखित, प्रमोद बाविस्कर दिग्दर्शित आणि विनोद बिंड निर्मित हे दोन अंकी नाटक आहे. कलारसिक संस्थेचा ‘अंधारवाटा’ या नाटकाचे लेखक अशोक आष्टीकर असून सतीश पवार दिग्दर्शक आहेत. २० नोव्हेंबरला हा प्रयोग सादर होणार आहे. कलाश्रय ज्ञान व कलासंवर्धन मंडळाचे ‘अम्मी’ हे नाटक २१ नोव्हेंबरला सादर होईल. या नाटकाचे लेखक शेखर ताम्हाने, प्रशांत गोडे दिग्दर्शक, तर निर्मिती प्रमुख गोडे काका आहेत. विशेष म्हणजे, ‘अम्मी’ याच नाटकाचा प्रयोग पुन्हा २२ नोव्हेंबरला आहे. कला वैभव नाट्य व सांस्कृतिक संस्थेचे हे नाटक अविश वत्सल यांनी दिग्दर्शित केले आहे. राज पावसेकर निर्मिती प्रमुख आहे.२४ नोव्हेंबरला ‘चारचौघी’ हे तीन अंकी नाटक सादर होईल. कल्याण बहुद्देशीय संस्था, प्रशांत दळवी लिखित व ललिता घोडे दिग्दर्शित हे नाटक आहे. पंचमवेद निर्मित ‘अनफेअर डील’ हे भगवान कृष्णा हिरे लिखित, राजाभाऊ भगत दिग्दर्शित नाटकाचा प्रयोग २६ नोव्हेंबरला होईल. सिद्धीविनायक प्रतिष्ठान प्रस्तुत दोन अंकी नाटक ‘ग्राऊंड झिरो’ २८ ला सादर होणार आहे. या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे लेखक, दिग्दर्शक आणि कलावंत म्हणून अशोक आष्टीकर हे यात भूमिका करीत आहेत. २९ला उडाण बहुद्देशीय संस्थेचे ‘उजळल्या दिशा’ या डॉ. सदानंद मोरे लिखित आणि नंदू मोहोड दिग्दर्शित हे नाटक आहे. बहुतांश नाटकांची प्रकाश योजना अशोक कार्लेकर यांची आहे.