शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळातील अल्पवयीन मुलीच्या धाडसाने बालविवाहाचा प्रयत्न उधळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 11:05 IST

आर्थिक मोबदल्याचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलींची राज्याबाहेर विक्री करून त्यांचे विवाह लावण्याचा प्रयत्न येथे उधळला गेला.

ठळक मुद्देमुलीची पोलिसात तक्रारआई व मध्यस्थ महिलेस अटक

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : आर्थिक मोबदल्याचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलींची राज्याबाहेर विक्री करून त्यांचे विवाह लावण्याचा प्रयत्न येथे उधळला गेला. येथील एका अल्पवयीन मुलीने यातून कशीबशी सुटका करीत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून मुलीची आई व मध्यस्थी करणाऱ्या महिलेस पोलिसांनी अटक केली.शहरातील चमेडीयानगरमध्ये घरकाम करणाऱ्या एका कुटुंबात दोन मुली आहेत. या मुलींना श्रीमंत घरातून मागणी आहे, असे म्हणून सुनिता गेडाम रा. बेंडकीपुरा या महिलेने चक्क गुजरातमधील अहमदाबादची सोयरीक आणली. त्या मुलाने मंगळवारी यवतमाळ गाठून दोन्ही मुलींना पाहिले. त्याने मोठेऐवजी लहानीला मागणी घातली. त्यानंतर या मुलीची आई व मध्यस्थी करणारी सुनिता ह्या दोघीही विवाह करण्यासाठी त्या लहान मुलीची मनधरणी करू लागल्या. या प्रकाराला मुलीच्या वडिलांचा विरोध होता.सदर मुलाचा अहमदाबादमध्ये साबणाचा कारखाना असल्याचे सांगण्यात आले. त्या मुलीला आई व मध्यस्थी करणाऱ्या महिलेने घराबाहेर पडू नको, अशी तंबी दिली. मात्र तिने मोबाईल रिचार्ज करण्याचा बहाणा करून घरातून सुटका करवून घेतली. ती मुलगी मंगळवारी रात्री १0 वाजता घराबाहेर पडली. मंगळवारची संपूर्ण रात्र तिने आठवडी बाजारातील मंदिरात काढली. दुसऱ्या दिवशी बुधवारी वडील शोध घेतील म्हणून तिने थेट शहर पोलीस ठाणे गाठले. तेथे तिचे वडील उपस्थित होते.

यापूर्वीही घडले प्रकारमुलीने पोलिसांत स्वत:ची आई व विवाहाचे स्थळ आणणाऱ्या सुनिता गेडामविरूद्ध तक्रार दिली. त्यावरून त्यांच्याविरूद्ध बाल विवाह रोकथाम अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी सुनिताला अटक केली. सहायक निरीक्षक राजू वटाणे तपास करीत आहेत. यापूर्वीही सुनिताने असे विवाह लावल्याची शक्यता आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा