शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळच्या ‘अर्धांतर’ लघुपटाची आंतरराष्ट्रीय स्पर्धेत बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 12:31 IST

यवतमाळच्या नीरज जवके या तरुणाने शेतकरी आत्महत्या व उपाय यावर निर्माण केलेल्या ‘अर्धांतर’ या लघुपटाने कोलकाता येथील आंतरराष्ट्रीय लघुपट स्पर्धेत बाजी मारली.

ठळक मुद्देशेतकरी आत्महत्याउपायांची कारण मिमांसा

हमीदखाँ पठाण ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यवतमाळच्या नीरज जवके या तरुणाने शेतकरी आत्महत्या व उपाय यावर निर्माण केलेल्या ‘अर्धांतर’ या लघुपटाने कोलकाता येथील आंतरराष्ट्रीय लघुपट स्पर्धेत बाजी मारली. जवके यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.यवतमाळ येथील तरूण नीरज जवके यांनी अवघ्या १६ मिनीटांचा ‘अर्धांतर’ हा लघुपट निर्माण केला आहे. या लघुपटातून शेतकरी आत्महत्यांना पूर्ण विराम मिळावा म्हणून संघटन हाच उपाय असल्याचा संदेश देण्यात आला. शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी या लघुपटाची निर्मिती करण्यात आली. ‘दि मेकर्स इंटरनॅशनल फिल्म अ‍ॅण्ड व्हिडीओ’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत या लघुपटाने बाजी मारली. कोलकाता येथे झालेल्या या स्पर्धेत दिग्दर्शक नीरज माणिकराव जवके यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार या लघुपटाने मिळवून दिला.बळीराजाला आत्महत्येपासून परावृत्त करण्याचा संदेश देण्यासाठी पुण्याई प्रॉडक्शन व द ग्रुप आॅफ फ्युचरतर्फे या लघुपटाची निर्मिती करण्यात आली. अवघ्या १६ मिनीटाच्या या लघुपटात केवळ शेतकऱ्यांच्या समस्याच न दाखविता त्यावरील उपाय योजनाही दर्शविण्यात आले आहे. हेच या लघुपटाचे वैशिष्ट्य ठरले आहे.या लघुपटाचे लेखन व सहदिग्दर्शन धनश्री टेकाडे, संगीत कोमल झोपाटे, मार्केटिंग नयन टेकाडे, प्रकाश व्यवस्था मिलींद ठाकरे व वेशभूषेची जबाबदारी प्रतीक्षा पडोळे यांनी सांभाळली. कोलकाता येथील स्पर्धेत विविध देशांतून अनेक लघुपट सादर झाले. या स्पर्धेत भारतातर्फे ‘अर्धांतर’ या एकमेव लघुपटाला नामांकन मिळाले होते. या लघुपटात विजय जोशी, प्रसन्ना गुजलवार, चेतन चौधरी, प्रसाद मिसाळ, विनोद मुधाने या प्रमुख कलाकारांसह मयूर आथिलकर, पंकज रोकडे, निखिल गावंडे यांनी सहकलाकारांच्या भूमिका साकारल्या आहे. हा लघुपट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी विपीन चौधरी, शैलेष डाखोरे, अनिल चौधरी, अवंती चौधरी, सायली चौधरी, प्रशांत गावंडे, अनिल टेकाडे आदींचे सहकार्य लाभले.शेतकऱ्यांचे संघटन आवश्यकया लघुपटातून शेतकऱ्यांच्या संघटनावर भर देण्यात आला. जोपर्यंत शेतकरी संघटीत होणार नाही, तोपर्यंत त्यांच्या समस्या सुटणार नाही, असा संदेश लघुपटातून देण्यात आला. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनस्तरावरून कोणत्या उपाययोजना केल्या जातात, याची प्रतीक्षा न करता शेतकऱ्यांनीही त्यांच्या समस्यासाठी एकत्र येऊन मार्ग शोधणे गरजेचे असल्याचा संदेश देण्यासाठी ‘अर्धांतर’ची निर्मिती झाल्याचे दिग्दर्शक नीरज जवके यांनी सांगितले.

टॅग्स :artकला