शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळमधील कृषी सचिवांनी घेतली आढावा बैठक, अनधिकृत किटकनाशके विकणा-यांवर कारवाई करण्याचे दिले आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 17:45 IST

किटकनाशक फवारणीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विषबाधा झाल्याच्या पार्श्वभुमीवर कृषी विभागाचे प्रधान सचिव बिजयकुमार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आज (दि.2) आढावा बैठक घेतली.

यवतमाळ, दि. 2 : किटकनाशक फवारणीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विषबाधा झाल्याच्या पार्श्वभुमीवर कृषी विभागाचे प्रधान सचिव बिजयकुमार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आज (दि.2) आढावा बैठक घेतली. यावेळी कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, अतिरिक्त जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर आदी उपस्थित होते.यावेळी बोलतांना प्रधान सचिव बिजयकुमार म्हणाले, किटकनाशक फवारणीमुळे काही शेतक-यांचा मृत्यू झाला असून मोठ्या संख्येने शेतकरी, शेतमजूर रुग्णालयात भरती आहेत. हा अतिशय गंभीर विषय आहे. त्यामुळे कृषी विभागाने गांभिर्याने काम करावे. तसेच ग्रामस्तरावरील यंत्रणेला अधिक सक्षम करून शेतक-यांना फवारणीबाबत वेळोवेळी मार्गदर्शन करावे. यात कोणतीही हयगय सहन केली जाणार नाही. कृषी अधिका-यांनी किटकनाशक वापरण्याबाबत मार्गदर्शक सुचना शेतक-यांना फिल्डवर जाऊन समजवून सांगाव्या. केवळ नफा कमाविण्याच्या उद्देशाने कृषी केंद्रांकडून अनधिकृत किटकनाशके विकली जात असेल तर त्याची चौकशी करा. अशा केंद्रांबद्दल कोणतीही सहानुभुती न दाखविता त्यांच्यावर त्वरीत कारवाई करा. कृषी केंद्र चालकांनीसुध्दा सामाजिक दायित्व जोपासून फवारणीबाबत शेतक-यांना योग्य सल्ला द्यावा. केवळ कंपन्यांच्या नफ्यासाठी काम करू नये. तसेच फवारणीदरम्यान विषबाधा होऊ नये म्हणून केंद्र चालकांनी शेतक-यांना हातमोजे, चष्मा असलेली किट स्वस्त दरात किंवा शक्य झाल्यास मोफत उपलब्ध करून द्यावी, असे सांगितले. यावेळी कृषी सचिवांनी जिल्ह्यात किती लोकांना विषबाधा झाली, मृतकांची संख्या किती, उपचार करून घरी पाठविलेल्या रुग्णांची संख्या, कृषी विभागाकडून करण्यात येणा-या उपाययोजना, रुग्णालयातील परिस्थती आदींबाबत माहिती घेतली. बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी.जी. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. टी.जी. धोटे, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ.सुरेश नेमाडे, मारेगावचे तहसीलदार विजय साळवे, जिल्हा कामगार अधिकारी राजदीप धुर्वे, केळापुरचे नायब तहसीलदार टी.डी.बोनगीरवार यांच्यासह उपविभागीय कृषी अधिकारी आदी उपस्थित होते. तत्पूर्वी फवारणीमुळे विषबाधा होऊन मृत झालेले कळंब येथील देविदास मडावी यांच्या घरी प्रधान सचिव बिजयकुमार यांनी भेट देऊन कुटुंबियांची विचारपूस केली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार डॉ. अशोक उईके, कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते. 

टॅग्स :agricultureशेती