शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

विकासाच्या नावाखाली यवतमाळकरांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 22:23 IST

विविध योजनांच्या माध्यमातून शहरात विकास कामे सुरू आहे. यावर शासकीय यंत्रणेचे लक्ष नाही. अनेक कामे निकृष्ट दर्जाची झाली. विकासाच्या नावावर लोकांचे हाल केले जात आहे, असा आरोप जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या तक्रारीतून केला आहे.

ठळक मुद्देसिमेंट रोड फोडले : पाईपलाईन पोहोचलीच नाही, पाणी मिळत नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विविध योजनांच्या माध्यमातून शहरात विकास कामे सुरू आहे. यावर शासकीय यंत्रणेचे लक्ष नाही. अनेक कामे निकृष्ट दर्जाची झाली. विकासाच्या नावावर लोकांचे हाल केले जात आहे, असा आरोप जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या तक्रारीतून केला आहे. याची गंभीर दखल घेण्यात यावी, अशी मागणी आम्ही यवतमाळकर संघटनेने केली आहे.शहरात विकास कामे करताना शासकीय नियमांना धाब्यावर बसविण्यात आले. सिमेंट रोड जागोजागी फोडले आहेत. काही भागात डांबररोड नव्याने तयार करण्यात आले. काही दिवसांपूर्वी तयार झालेले हे रस्ते आता खोदले जात आहे. ड्रेनेज सिस्टिमची कामे निकृष्ट केली जात आहे. ३०२ कोटी रुपयांची पाईप लाईन आजपर्यंत पूर्ण झाली नाही. नऊ किमीपर्यंतचीच पाईपलाईन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाईपलाईन जागोजागी फुटली आहे. निळोणा आणि चापडोह प्रकल्पात मुबलक पाणी असताना यवतमाळकरांना पाणी मिळत नाही. पाटीपुरा, अंबिकानगर, इंदिरानगर, भोसारोड, अभिनव कॉलनी या भागात महिनाभरापासून पाणी आले नाही. मुळात पाणी पुरवठ्याचे वेळापत्रकच पाळले जात नाही. हा संपूर्ण प्रकार गंभीर आहे. यात नागरिकांचे हाल होत आहे.शहरात नाल्या खोदताना उतार काढला नाही. संपूर्ण काम ओबडधोबड झाले आहे. यामुळे शहरात चालनेही अवघड आहे. विशेष म्हणजे या कामावर कुणाचेही लक्ष नसल्याचा आरोप आम्ही यवतमाळकरांनी केला आहे. यावेळी अ‍ॅड.जयसिंग चव्हाण, अ‍ॅड. विपीन ठाकरे, अ‍ॅड. वसंत मोहर्लीकर, सुनील तिवारी, विजय बुंदेला, अविनाश धनेकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.जिल्हाधिकारी प्रत्यक्ष लक्ष घालणारपाणी पुरवठ्याचे टँकर लावण्यात आल्याचे यवतमाळ नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र शहरात कुठेही टँकर सुरू नाही. पालिकेने जिल्हा प्रशासनाला खोटी माहिती दिली, असे तक्रारकर्त्यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना सांगितले. या प्रकरणी सखोल चौकशी करून प्रत्यक्ष लक्ष घालण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रारकर्त्यांना दिले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीWaterपाणी