शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळकरांची रसिकता बावनकशी सोन्यासारखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 00:15 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानंतर येथील कवी-लेखकांनी कुठलाही आळस न करता अंकुर साहित्य संघाच्या अंतर्गत ‘आगमन शिशिराचे रंग कथा कवितेचे’ हा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमातील भरगच्च उपस्थिती बघता यवतमाळकरांची रसिकता व उत्साह बावनकशी सोन्यासारखा आहे, .....

ठळक मुद्देअरविंद भोंडे : अंकुर साहित्य संघाचा ‘रंग कथा कवितेचे’ कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानंतर येथील कवी-लेखकांनी कुठलाही आळस न करता अंकुर साहित्य संघाच्या अंतर्गत ‘आगमन शिशिराचे रंग कथा कवितेचे’ हा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमातील भरगच्च उपस्थिती बघता यवतमाळकरांची रसिकता व उत्साह बावनकशी सोन्यासारखा आहे, असे उद्गार अंकुरचे केंद्रीय अध्यक्ष अरविंद भोंडे यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री प्रा. वसंतराव पुरके होते. अंकुरचे केंद्रीय सचिव हिंमत ढाळे, ज्येष्ठ पत्रकार पद्माकर मलकापुरे, केंद्रीय कार्याध्यक्ष तुळशिराम बोबडे, जिल्हाध्यक्ष विद्या खडसे, शाखाध्यक्ष प्रमोद देशपांडे, अभियंता मनोहर शहारे, सिकंदर शहा, यशवंत बापू पाटील, केंद्रीय उपाध्यक्ष सुरेश गांजरे आदी मंचावर उपस्थित होते.प्रा. पुरके म्हणाले, रानावनातील रोपट्यांना शिशिरात जो नवपालवीचा बहर येतो, त्यामुळे आसमंताला चैतन्य लाभते. तेच चैतन्य या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेणाऱ्या विद्या खडसे कौतुकास पात्र आहेत. शिवाय सुनिल खडसे हे खºया अर्थाने सोशल इंजिनियर आहे. त्यांच्या परिश्रमाने अंकुर साहित्य चळवळ जिल्ह्यात विकसित झाली आहे. प्रास्ताविक अंकुरच्या जिल्हाध्यक्ष विद्या खडसे यांनी केले. सूत्रसंचालन नितीन धोटे तर प्रा. महेश मोकडे व समिना शेख यांनी आभार मानले. यशस्वितेसाठी सचिव महेश अडगुलवार, कोषाध्यक्ष सुरेश राऊत, समिना शेख, सुवर्णा ठाकरे, सुनिल खडसे, अलका राऊत, कल्पना मादेशवार, प्रमिला उमरेडकर, तोष्णा मोकडे यांनी परिश्रम घेतले.मान्यवर, कलावंतांचा गौरवया प्रसंगी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. रमाकांत कोलते, सुमती कोलते, विद्या खडसे, सुनिल खडसे, संगीता सव्वालाखे, मनोहर शहारे, किशोर तळोकार यांचा सत्कार करण्यात आला. युवा संगीतकार व गायक अजिंक्य सोनटक्के, गोल्डन पिक्सल पुरस्कार प्राप्त व्हीएफएक्स आर्टिस्ट निखिल मलकापुरे यांना विशेष सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. हे सन्मान चिन्ह सविता मलकापुरे यांनी स्वीकारले. कथाकार नरेंद्र इंगळे अकोट, मुकुंद तेलीचरी पुणे यांचा प्रा. वसंतराव पुरके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.