शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

यवतमाळकरांनो, किराणा घेताय की कोरोना ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 05:01 IST

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. २४ जुलैच्या मध्यरात्रीपासून ३१ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लॉकडाऊन घोषित केले. तत्पूर्वी शुक्रवारी नागरिकांना खरेदीसाठी सायंकाळी ५ वाजतापर्यंत वेळ दिली होती. यामुळे शुक्रवारी शहराच्या बाजारपेठेत विविध वस्तू खरेदीसाठी एकच गर्दी उसळली होती.

ठळक मुद्देखरेदीसाठी उसळली गर्दी : सण-उत्सवाची पार्श्वभूमी, लॉकडाऊनच्या घोषणेमुळे घाई, पुढील आठ दिवस शहरात संचारबंदीसणांसाठी किराणा, कापड खरेदी, गर्दीमुळे संसर्गाचा धोका वाढला

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हाधिकाऱ्यांनी २४ जुलैच्या मध्यरात्रीपासून पुढील सात दिवसांसाठी कडक लॉकडाऊन घोषित केला. त्यामुळे शुक्रवारी यवतमाळच्या बाजारपेठेत खरेदीसाठी तोबा गर्दी उसळली होती. या गर्दीने नागरिक किराणा घेत आहेत की कोरोना, असा प्रश्न निर्माण झाला होता.जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. २४ जुलैच्या मध्यरात्रीपासून ३१ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लॉकडाऊन घोषित केले. तत्पूर्वी शुक्रवारी नागरिकांना खरेदीसाठी सायंकाळी ५ वाजतापर्यंत वेळ दिली होती. यामुळे शुक्रवारी शहराच्या बाजारपेठेत विविध वस्तू खरेदीसाठी एकच गर्दी उसळली होती.दत्त चौक, नेताजी चौक, मेनलाईन, आझाद मैदान, स्टेट बँक रोड, तहसील चौक, आठवडीबाजार परिसर आदी ठिकाणी ग्राहकांनी विविध दुकानात एकच गर्दी केली होती. ठिकठिकाणी पोलीस तैनात होते. मात्र या गर्दीवर कुणाचेही नियंत्रण नव्हते. नागरिक बिनधास्तपणे दुचाकीवरून डबल सीट जाताना दिसत होते. बसस्थानक चौकात वाहतूक पोलिसांनी अशा चालकांना रोखण्याचा प्रयत्न केला. काहींना दंडही ठोठावला. तरीही गर्दीवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले होते. त्यातच शनिवारी नागपंचमी असल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर दुकानात गर्दी केली होती. यानंतर १ ऑगस्टला बकरी ईदचा सण येत आहे. तत्पूर्वी ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे.भाजीपाल्याचा तुटवडालॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर भाजी मंडईत पहाटे ३ वाजतापासूनच नागरिकांनी गर्दी केली होती. अनेकांनी आठवडाभराचा भाजीपाला खरेदी केल्याने काही वेळातच संपूर्ण भाजीपाला संपला. त्यामुळे अनेकांना परत जावे लागले. मात्र गर्दीमुळे शहरात कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. लॉकडाऊनच्या सात दिवसानंतर शहरात कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता अनेकांनी वर्तविली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार