शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
6
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
7
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
8
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
9
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
10
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
11
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
12
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
13
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
14
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
15
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
16
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
17
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
18
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
19
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
20
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे

पाण्यासाठी रात्र जागून काढतात यवतमाळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 00:44 IST

शहरात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ही टंचाई निवारण्यात शासन-प्रशासनाला पूर्णत: अपयश आले आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागत आहे. शहराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात बोअरपुढे रांगाच पाहायला मिळते.

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ही टंचाई निवारण्यात शासन-प्रशासनाला पूर्णत: अपयश आले आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागत आहे. शहराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात बोअरपुढे रांगाच पाहायला मिळते.गतवर्षी जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ५६२.९३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या ६१ टक्के आहे. या अपुºया पावसाने शहराला पाणी पुरवठा करणारे निळोना आणि चापडोह प्रकल्प भरले नाही.यानंतरही शहरातील पाणी पुरवठयाच्या वेळापत्रकात बदल झाले नाही. दोन दिवसाआड पाणी पुरवठा राहीला. जीवंतसाठा संपल्यावर आठ दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात आला. मार्च मध्ये १२ दिवसा आड पाणी पुरवठयाची घोषणा झाली. तेव्हापासून प्राधिकरणाचे वेळापत्रकच कोलमडले. १२ दिवसाआड पाणी पुवठयाची घोषणा असतांनाही. अनेक भागात २० ते २५ दिवस पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी आल्या. नंतरच्या काळात एप्रिल आणि मे मध्ये महिन्याच्या अवधीने पाणी पुरवठा झाला. काही भागात हे पाणी उपलब्ध झाले नाही.यामुळे जनसामान्यात रोष वाढला. पालकमंत्र्यांना घेराव करने, त्यांच्याघरावर धडक देने, बांगडया फोडने, चक्काजाम आदोंलन यासह विविध आंदोलन शहरात सुरू आहे. जीवन प्राधिकरण आणि नगर पालिकेवर दररोज मोर्चेकरी निवेदन घेवुन येत आहे. आम्हाला पाणी द्या अशी ते मागणी करीत आहे.शहरात पाणी पुरवठा करणारी यंत्रणा कोलमडली आहे. पाण्याचे स्त्रोतही आटले आहेत. यामुळे शहरातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी लावलेल्या टँकरकरीता पाणी आनायचे कुठून असा गंभीर प्रश्न प्रशासनापुढे निर्माण झाला आहे.यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा आणि चापडोह प्रकल्पातील जलसाठा संपला आहे. यामुळे या धरणातून शहरातील प्रत्येक घरापर्यंत पोहचणारी पाण्याची रसदच थांबली आहे. त्याला पर्याय म्हणून टँकरची व्यवस्था उभारण्यात आली आहे. दोन लाख १७ हजार लोक संख्येसाठी नगरपरिषदेचे ६४ टँकर अपुरे पडत आहे. पाणी वाटप करताना नगरसेवक भेदभाव करतात, असे आरोप होत आहे. यातुन वाहन तोडफोडीच्या घटना घडल्या. टँकर चालकाला मारहान झाली. लोक टँकरच्या समोर आडवे होवुन झोपत आहे. प्रत्येकजन मिळेल त्या ठिकाणावरून पाणी घेवुन जाण्याचाच प्रयत्न करीत आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने पाण्याची धुरा कर्मचाºयांवर सोडली. यानंतरही पाणी वाटपाचा प्रश्न सुटला नाही. हा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे. पाण्याचा प्रश्न सोडविण्यात प्रशासन आणि शासन अपयशी ठरले. यामुळे यवतमाळकरांनी पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी स्वत:च कंबर कसली आहे. दिवसभर काम करायचे आणि रात्री शहरात मिळेल त्या बोअरवरून पाणी आणायचे. जाजू चौक, वाघापूर नाका, जिल्हा परिषद ते आर्णी मार्ग, पिंपळगाव, लोहारा, धर्मशाळा, यासह विविध भागात पाण्यासाठी बोअरसमोर सर्वसामान्यांच्या रांगा पाहायला मिळत आहे. या ठिकाणावरून पाणी नेण्यासाठी चारचाकीचा वापर केला जात आहे. काही दुचाकी, सायकल आणि रिक्षाचा वापर केला जात आहे. पाण्याच्या या भयावह स्थितीने प्रत्येकाच्या अंगावर काटा उभा केला आहे.टँकरला आठ दिवसाचे ‘वेटिंग’खासगी टँकरने पाणी बोलविण्यासाठी आठ दिवसाचे ‘वेटिंग’ आहे. यामुळे आज नंबर लावला तर आठ दिवसात कधीतरी एकवेळा पाणी मिळेल, अशीच स्थित आहे. पूर्वी खासगी टँकरचे दर ३५० रूपये होते. आता हे दर १४०० रूपयांवर पोहचले आहे. यामुळे सर्वसामान्याचा खिसा रिकामा झाला. यानंतरही स्थिती जैसे थे अशीच आहे. तर दुसरीकडे नगर परिषद प्रशासनाचा पाण्याचा दररोजचा खर्च लाखांच्या घरात आहे. यानंतरही नागरिकांना मात्र पाणी मिळने अवघड झाले आहे.वाहन धुणारे वर्कशॉप अडचणीतदुचाकी आणि चारचाकी वाहने धुणारे वर्कशॉप पाण्याअभावी बंद आहेत. अनेक वर्कशॉपमधील बोअरला पाणी नाही. यामुळे वर्कशॉप बंद ठेवण्याची वेळ व्यावसायिकांवर आली आहे.लाँड्रीचे दर वाढलेपाणीटंचाईमुळे लाँड्री व्यावसायिकांनी कपडे धुण्याचे दर वाढविले आहे. त्यामध्ये ड्रायक्लीनच्या कपाड्यांना सर्वाधिक खर्च लागत आहे. एका साडीचे ड्रायक्लीन दर ३५० रूपये आहेत. त्यात काही पैसे टाकले तर नवीन साडी खरेदी होईल, अशीच स्थिती बाजारात आहे.रात्री कमी दाबाची वीजविजेवर चालणाºया सर्वच वस्तूंचा ताण रात्री वाढत आहे. यामुळे रात्री विजेची मागणी अचानक वाढत आहे. एकदम लोड वाढल्याने विजेचे व्होल्टेज कमी होत आहे. यामुळे एसीची थंड करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत होते, अशा तक्रारी वाढल्या आहे. पूर्ण क्षमतेने वीज नसल्याने असा प्रकार घडत असल्याचे वीज कंपनीने स्पष्ट केले आहे.दोन लाख युनिटने वीज वापर वाढलाउन्हाच्या वाढत्या पाºयाने विजेची मागणी वाढली आहे. पंखे, कुलर आणि एसी सोबत फ्रिजरचा वापर वाढतो. यामुळे प्रत्येक कुटुंबात विजेची मागणी वाढते. शहराला दररोज चार लाख युनिट वीज लागत लागते. उन्हाळ्यात वीज वापर सहा लाख युनिटपर्यंत पोहोचला आहे. यामुळे वीज बिलाची वसुली ८० ते ९० लाख रूपयावरून सव्वा लाख ते दीड कोटीपर्यंत गेली आहे. पंखा, कुलर आणि एसीमुळेच रिडींग दीडपटीने वाढले आहे.सात हजार एसी विकलेकुलर चालविण्यासाठी अधिक पाण्याची गरज भासते. यामुळे अनेक नागरिकांनी कुलरऐवजी एसी खरेदी केला आहे. विजेची बचत करणारे आणि पाणी नसले तरी थंड हवा देणारे एसी सर्वाधिक विकले जात आहे. यवतमाळ आणि वणीच्या बाजारात ७ हजारांच्या आसपास एसीची विक्री झाली आहे. मोठ्या कुलरला पाणी जास्त लागते. यामुळे नागरिकांनी छोटे कुलर खरेदी करून वापरण्यास सुरूवात केली आहे.पिकाचा भाव कवडीमोलउन्हाचा पारा सतत वाढत आहे. अशा स्थितीत भाजीपाला पीक जगविणे शेतकºयांना अवघड झाले. एका एकराला दररोज टँकरभर पाणी द्यावे लागते. एक टँकर १४०० रूपयांचे असले तरी एक एकरातून ५०० रूपयांचा भाजीपाला निघणे अवघड झाले आहे. कॅनभर पाण्याला ३० रूपये मोजावे लागतात. भाजीपाला पिकविताना भाजी विक्रीस येईपर्यंत एका झाडाला किमान दोन कॅन पाणी लागते. ६० रूपयांचे पाणी आणि वीज बिल वेगळेच. मानवी श्रम, फवारणी, खत आणि लागवड खर्च वेगळा, भाजीमंडईपर्यंत भाजीपाला आणण्यासाठी लागणारा खर्च वेगळा आहे. तरी भाजीपाल्याचे ५ रूपये ते १० रूपयापर्यंतच आहे. अशात शेतकऱ्यांचा खर्च निघणे अवघड आहे. वांग्याचे दर २ ते ५ रूपयांपर्यंत आहे. पालक, टमाटर, कांदा आणि कोबीचे दरही पडलेले आहेत. किमान दुष्काळी स्थितीत भाजीपाल्याला चांगले दर मिळतील, अशी अपेक्षा शेतकºयांना होती. प्रत्यक्षात शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई