शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

यवतमाळकरांनो पाणी जपून वापरा

By admin | Updated: May 22, 2017 01:51 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा प्रकल्पातील मृतसाठा संपत आला असून आता तीन दिवसांआड

मृतसाठा संपला : आठ दिवसांआड पाण्याची शक्यता लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा प्रकल्पातील मृतसाठा संपत आला असून आता तीन दिवसांआड पाणी पुरवठा करणे प्राधिकरणाला शक्य होणार नाही. त्यामुळे लवकरच आठ दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. यवतमाळकरांनो पाणी जपून वापरा असा सल्ला जीवन प्राधिकरणाने दिला आहे. यवतमाळ शहराला निळोणा आणि चापडोह या दोन प्रकल्पातून पाणी पुरवठा केला जातो. निळोणा प्रकल्पाची साठवण क्षमता कमी आहे. वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने प्रकल्पातील साठा कमी पडतो. त्यामुळे या प्रकल्पातील पाणी वेळेपूर्वीच संपून जाते. यंदाही निळोणातील पाणी १५ दिवसापूर्वी संपले. त्यानंतर प्राधिकरणाने प्रकल्पाच्या मृतसाठ्यातून पाण्याचा उपसा सुरू केला. आता मृतसाठाही केवळ दोन-तीन दिवस पुरेल एवढाच आहे. त्यामुळे शहराची संपूर्ण भिस्त चापडोह प्रकल्पाच्या पाण्यावर राहणार आहे. चापडोहमध्ये मुबलक पाणी असले तरी पुरेशा प्रमाणात पाणी ओढणारी यंत्रणा प्राधिकरणाकडे नाही. साठवण क्षमता लक्षात घेता प्राधिकरणाला दररोज लागणाऱ्या पाण्यापेक्षा निम्मेच पाणी उपलब्ध होणार आहे. परिणामी यवतमाळ शहराच्या पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करावा लागणार आहे. सध्या यवतमाळकरांना तीन दिवसाआड अर्थात आठवड्यातून दोन दिवस पाणी पुरविले जाते. चापडोहमधून पाणी घेतल्यास यवतमाळकरांना आठ दिवसातून एकदाच पाणी मिळणार आहे. तसेच शहरातील प्रत्येक भागाला पाणी पोहोचवितानाही मोठी कसरत करावी लागेल. पावसाळ्यात निळोणा धरण ओव्हर-फ्लो होईपर्यंत यवतमाळकरांना पाणी जपूनच वापरावे लागणार आहे. १६ दशलक्ष लिटर पाण्याची कमतरता ४निळोणा आणि चापडोह प्रकल्पातून शहराला ३३ दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. निळोणातून १६ दशलक्ष लिटर तर चापडोहतून १७ दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा होतो. आता निळोणातील १६ दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा थांबेल. परिणामी शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.