शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

महिलांनी उचलली सामाजिक सुधारणांची धुरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2019 15:12 IST

जिजाऊंची प्रेरणा घेवून काम करणाऱ्या मराठा-कुणबी समाजातील महिलांनी चक्क राज्यस्तरीय परिचय मेळाव्यांची मुहूर्तमेढ रोवली आहे. एक- दोन नव्हे तर तब्बल चार वर्षांपासून हे यशस्वी आयोजन होत आहे.

ठळक मुद्देजिजाऊंची प्रेरणा घेवून काम करणाऱ्या मराठा-कुणबी समाजातील महिलांनी चक्क राज्यस्तरीय परिचय मेळाव्यांची मुहूर्तमेढ रोवली आहे. समाजाचा परिचय मेळावा महिलांनीच घेण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे. समाजाचा परिचय मेळावा महिलांनीच घेण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे.

मुकेश इंगोले

दारव्हा (यवतमाळ) - सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीमध्ये उपवर-वधू परिचय मेळाव्यांचे स्थान महत्वपूर्ण आहे. असे मेळावे विशेषत: पुरुष कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने पार पडतात. मात्र जिजाऊंची प्रेरणा घेवून काम करणाऱ्या मराठा-कुणबी समाजातील महिलांनी चक्क राज्यस्तरीय परिचय मेळाव्यांची मुहूर्तमेढ रोवली आहे. एक- दोन नव्हे तर तब्बल चार वर्षांपासून हे यशस्वी आयोजन होत आहे. समाजाचा परिचय मेळावा महिलांनीच घेण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे.

दारव्हा येथे कुणबी समाजाच्या परिचय, विवाह मेळाव्यांची अनेक वर्षांची परंपरा आहे. मध्यंतरी माजी आमदार दिवंगत बाळासाहेब घुईखेडकर मेळावे घेत होते. ११ वर्षांपूर्वी वसंतराव घुईखेडकर यांनी पुढाकार घेतला. तेव्हापासून मराठा- कुणबी सर्व शाखांना एकत्र करून सहकार महर्षी बाळासाहेब घुईखेडकर जयंती महोत्सवानिमित्त दरवर्षी मेळावा होतो. पण चार वर्षांपासून या परंपरेतही अत्यंत महत्वाचे पुरोगामी बदल करण्यात आले. मेळाव्याच्या आयोजनाची संपूर्ण जबाबदारी महिलाच पार पाडतात. सर्व शाखेय महिला मराठा-कुणबी समाज व सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्ष प्रा.डॉ. संगीता वसंतराव घुईखेडकर यांच्या नेतृत्वात महिला आयोजनाची जबाबदारी स्वीकारतात आणि यशस्वी करतात. दहा वर्षापूर्वी या महिला मंडळाची स्थापना झाली. त्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे कार्यक्रम होतात. 

राज्यस्तरीय उपवर - वधू परिचय मेळाव्याची संपूर्ण जबाबदारी या मंडळाने खांद्यावर घेतली. महिलांना ही जबाबदारी पेलणार नाही, असे सुरुवातीला पुरुष मंडळींना वाटत होते. मात्र नारीशक्तीने हे आव्हान लिलया पेलले. घरोघरी फिरून देणगी गोळा केली. पत्रके व विविध माध्यमांद्वारे प्रसिद्धीही करण्यात आली. निमंत्रण पत्रिका वाटल्या. अतिथींना निमंत्रण, परिचय पत्रिका तयार करणे, भव्य मंडप उभारणे, बैठक व्यवस्था, मेळाव्याच्या दिवशी मान्यवरांचे स्वागत, मार्गदर्शन, उपवर - वधूंचा परिचय, समाजबांधवांसाठी भोजनाची व्यवस्था या सर्व बाबी मेळाव्यात यथासांग पार पाडल्या जातात. त्यासाठी महिलाच झटतात. वैचारिक मार्गदर्शन अन् सहभागही वाढला

समाजाची वैचारिक पातळी वाढावी याकरीता पूर्णीमाताई सवाई, निलीमा काळे, प्रमिला जाधव, खासदार भावना गवळी, शिक्षण विभागाच्या सहसंचालक अर्चना नेरकर, प्रा. छायाताई महाले, अमरावतीच्या रजिया सुलताना अशा विविध क्षेत्रातील महिलांना मार्गदर्शनासाठी निमंत्रित करण्यात आले. महिलांनी पुढाकार घेतल्यानंतर महिलांचा सहभाग आणि परिचय देणाऱ्यांचीही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.  

विवाहांमधील आनाठायी खर्च टाळून यानिमित्ताने समाज एकत्र येत आहे. चार वर्षांपासून हा मेळावा महिलांच्या पुढाकाराने होत असल्याने वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे. समाजातील पुरुष मंडळींचेही सहकार्य आहे. 

- प्रा.डॉ. संगीता घुईखेडकर, अध्यक्ष, सर्व शाखेय मराठा - कुणबी समाज व सांस्कृतिक मंडळ, दारव्हा

टॅग्स :Yavatmalयवतमाळmarriageलग्न