शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सहकाराच्या अंमलबजावणीत यवतमाळ राज्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 11:57 IST

सहकार पणन व वस्त्राद्योग विभागातर्फे सहकारी संस्थांचे पुनरुज्जीवन केले जात आहे. राज्यातील पाच हजार संस्था या माध्यमातून सक्षम केल्या जाणार आहे. यवतमाळ जिल्हा या अभियानात पहिल्या क्रमांकावर आहे.

ठळक मुद्देसहकारी संस्थांचे बळकटीकरण पुणे दुसऱ्या, तर मुंबई तिसऱ्या क्रमांकावर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सहकार पणन व वस्त्राद्योग विभागातर्फे अटल महापणन विकास अभियान राबविले जात आहे. या अभियानात डबघाईस आलेल्या सहकारी संस्थांचे पुनरुज्जीवन केले जात आहे. राज्यातील पाच हजार संस्था या माध्यमातून सक्षम केल्या जाणार आहे. यवतमाळ जिल्हा या अभियानात पहिल्या क्रमांकावर आहे.यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक आहे. या स्थितीवर मात करून जिल्ह्यातील २४० सहकारी संस्था या अभियानात स्वबळावर उभ्या राहण्यासाठी तयार झाल्या. यातील १२२ सहकारी संस्थांनी स्वत:चा स्वनिधी वापरून व्यवसाय सुरू केला आहे. या व्यवसायात संस्थेने स्वत:चा निधी गुंतवून उत्पन्न वाढविले आहे. विशेष म्हणजे पूर्वी ९० टक्के संस्थांचा व्यवसाय केवळ कर्ज वितरण करणे आणि तो वसूल करणे एवढाच होता. आता अटल महापणन विकास अभियानाच्या माध्यमातून विविध नावीन्यपूर्ण व्यवसायाची निवड सहकारी संस्थांनी केली आहे.रासायनिक खत विक्री, आरो वॉटर, माती परीक्षण प्रयोगशाळा, गाव पातळीवर एटीएम, गांडूळ खत निर्मिती, क्लिनींग ग्रेडींग युनिट या व्यवसायासह अनेक व्यवसायांचा यामध्ये समावेश आहे. पूर्वी या संस्था ‘ब’ आणि ‘क’ आॅडिटमध्ये आल्या होत्या. त्यांच्याकडे निधी नसल्याने त्या अवसायनात जाण्याचा धोका होता. मात्र आता महाअभियानामुळे या संस्था नव्याने कामाला लागल्या. यातून गाव पातळीवरील सहकारी संस्थांचे पुनरुज्जीवन होत आहे. त्याचा लाभ थेट शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना मिळणार आहे.या अभियानात राज्यात यवतमाळ जिल्ह्याने उत्तम कामगिरी केली. विशेष म्हणजे अवसायनात पडलेल्या संस्थांना बळकट करण्यात पुणे आणि मुंबईदेखील मागे पडले आहेत. सहकार क्षेत्रात उत्तम कार्य करण्यास गेल्या ७३ वर्षांच्या इतिहासात विदर्भातील यवतमाळ प्रथमच पुढे आले. पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे.क्रांतीदिनी यवतमाळचा पुण्यात सत्कारसहकार आयुक्तालयाने ९ ऑगस्टला पुण्यात आढावा बैठक घेतली. या बैठकीत सहकार मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक डॉ.राजाराम दहे उपस्थित होते. त्यांनी अटल महापणन अभियानातील यवतमाळ जिल्ह्याच्या कामाचे कौतुक केले. जिल्हा व्यवसाय विकास व पणन व्यवस्थापक अक्षय देशमुख यांचा सत्कारही केला.योजनेच्या अंमलबजावणीत यवतमाळ राज्यात अव्वल आहे. ही जिल्ह्याच्या इतिहासातील पहिली घटना आहे. यातून सहकार चळवळीला नवी दिशा मिळेल. गावांचा विकास होण्यास मदत होईल.- अर्चना माळवीजिल्हा उपनिबंधक, यवतमाळ.

टॅग्स :Governmentसरकार