शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळची चमू पूरग्रस्तांच्या साथीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 22:29 IST

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी यवतमाळच्या समाजकार्य महाविद्यालयाची चमू मंगळवारी कोल्हापूर, सांगलीकडे रवाना होणार आहे. तत्पूर्वी या मदतफेरी काढली जाणार आहे. गोळा झालेली मदत पूरग्रस्तांना वितरित केली जाणार आहे, अशी माहिती येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली.

ठळक मुद्देसंडे अँकर । समाजकार्य महाविद्यालयातील ९० विद्यार्थ्यांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी यवतमाळच्या समाजकार्य महाविद्यालयाची चमू मंगळवारी कोल्हापूर, सांगलीकडे रवाना होणार आहे. तत्पूर्वी या मदतफेरी काढली जाणार आहे. गोळा झालेली मदत पूरग्रस्तांना वितरित केली जाणार आहे, अशी माहिती येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली.येथील समाजकार्य महाविद्यालयाने आतापर्यंत नैसर्गिक आपत्ती काळात विविध प्रांतात मदतकार्य केले. यावर्षीच्या पूरपरिस्थितीतून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी विद्यार्थ्यांची चमू तेथे प्रत्यक्ष कार्य करणार आहे. यासाठी ९० विद्यार्थ्यांची टिम सज्ज ठेवण्यात आली आहे. महाविद्यालयातील द्वितीय आणि अंतिम वर्षाचे विद्यार्थी यासाठी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जाणार आहे.कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील जलप्रलयाच्या ठिकाणी ही चमू मदत करणार आहे. रविवारी समाजकार्य महाविद्यालयातून मदतफेरी काढली जाईल. मदत साहित्य स्वीकारण्यासाठी विठ्ठलवाडी भागातील सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालयासह आठ केंद्रांची निर्मिती करण्यात आली. यापूर्वी अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला, अशी माहिती यावेळी देण्यात आली. पत्रपरिषदेला प्रा. घनशाम दरणे, मिनल जगताप आदींची उपस्थिती होती.आपत्ती काळात मदतीचा हातयवतमाळच्या समाजकार्य महाविद्यालयाने देशात निर्माण झालेल्या आपाद्ग्रस्त परिस्थितीत मदतीचा हात दिला आहे. गेली ३५ वर्षांपासून महाविद्यालय यासाठी पुढाकार घेत आहे. २००१ मध्ये गुजरात भूकंप, २००४ मधील त्सुनामी, २००८ मधील बिहार राज्यातील पूर परिस्थिती, २०१८ मध्ये केरळमध्ये पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत मदत करण्यासाठी या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची चमू दाखल झाली होती. प्रत्येक ठिकाणी दोन ते चार आठवडेपर्यंत मदतकार्यात सहभाग नोंदविला, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.देवराव पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मदतीसाठी रॅलीपूरग्रस्तांच्या मदतीसाठी शहरातील काही शाळा पुढे आल्या. विद्यार्थ्यांनी लोकसहभागातून २१ हजार रुपयांची मदत गोळा केली. भाऊराव देवराव पाटील शाळा, देवीदास गायकवाड इंग्लिश मीडियम स्कूल आणि लर्निंग पॉर्इंट इंग्लिश स्कूलच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर आणि सांगलीच्या पूरग्रस्तांसाठी रॅली काढली. यावेळी रोख, धान्य, कापड आणि वस्तूरूपात मदत गोळा करण्यात आली. रॅलीसाठी संस्थेचे सचिव अनिल गायकवाड, संचालिका अश्विनी गायकवाड, मुख्याध्यापक देवराव फटींग आदींनी पुढाकार घेतला.

टॅग्स :floodपूर