शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळचा निकाल ९१.९८ टक्के; यंदाही मुलींनीच मारली बाजी

By अविनाश साबापुरे | Updated: May 25, 2023 15:28 IST

यावर्षी जिल्ह्यातील १४ हजार २७५ विद्यार्थी बारावीत उत्तीर्ण झाले असून त्यांच्या निकालाची टक्केवारी ९०.१० टक्के आहे.

यवतमाळ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. यात जिल्ह्याचा निकाल ९१.९८ टक्के इतका लागला असून यंदाही मुलांपेक्षा मुलींनीच पुन्हा एकदा बाजी मारल्याचे स्पष्ट झाले. यंदा जिल्ह्यातून २९ हजार ९०७ नियमित विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. त्यापैकी २७ हजार ५०१ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. विशेष म्हणजे १५१२ विद्यार्थ्यांनी प्राविण्यश्रेणी मिळविली आहे. तर ८ हजार ५५३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेत. १३ हजार २०४ विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणीवरच समाधान मानावे लागले. अभ्यासक्रम शाखानिहाय विचार करता यंदा विज्ञान शाखेचा सर्वाधिक म्हणजे ९७.८४ टक्के निकाल आला आहे. त्याखालोखाल वाणिज्य शाखेचा ९२.२८ टक्के तर कला शाखेचा निकाल केवळ ८६.९१ टक्के इतका लागला आहे. तर व्यावसायिक अभ्यासक्रमातून ८७.५८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

यावर्षी जिल्ह्यातील १४ हजार २७५ विद्यार्थी बारावीत उत्तीर्ण झाले असून त्यांच्या निकालाची टक्केवारी ९०.१० टक्के आहे. तर १३ हजार ६८५ विद्यार्थिनींनी बारावी निकालात यश मिळविले असून त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही ९४.०२ इतकी आहे. बारावीच्या निकालाचा तालुकानिहाय विचार करता यंदा महागाव तालुक्याचा निकाल सर्वाधिक म्हणजे ९६.०९ टक्के लागला आहे. त्यानंतर नेर तालुक्यानेही बाजी मारत ९५.९३ टक्के विद्यार्थ्यांना यश मिळवून दिले आहे. बाभूळगावमधून ९४.८५ टक्के विद्यार्थी यशस्वी झालेत. आर्णी ९४.२६, उमरखेड ९३.६१, दारव्हा ९३.६०, यवतमाळ ९२.३८, पुसद ९२.२६, कळंब ९२.२१, घाटंजी ९१.६९, दिग्रस ९१.३५, झरी ९०.५६, राळेगाव ९०.५६, मारेगाव ८९.८९, पांढरकवडा ८८.०६, तर वणी तालुक्याचा निकाल सर्वात कमी म्हणजे ८०.८७ टक्के लागला आहे.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालHSC / 12th Exam12वी परीक्षा