लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल तिवसा येथील राजीव गांधी विद्यालयाचे शिक्षक प्रशांत मधुकर पंचभाई यांना राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.सोलापूर येथे झालेल्या सोहळ्यात शिक्षणमंत्री विनोद तावडे आदी मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे मानकरी ठरलेले ते यवतमाळ जिल्ह्यातील एकमेव शिक्षक आहे.प्रशांत पंचभाई हे यवतमाळ जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष आहे. स्काऊट-गाईड, इन्स्पायर अवॉर्ड, विज्ञान प्रदर्शन, स्वच्छता, जलस्वराज्य, पल्स पोलिओ, अंधश्रद्धा निर्मूलन, वृक्षारोपण, ग्रंथालय आदी उपक्रमात त्यांचे मोठे योगदान आहे. पुरस्कार स्वीकारताना मनीषा प्रशांत पंचभाई आदींची उपस्थिती होती. त्यांच्या यशाचे येथे कौतुक होत आहे.
यवतमाळचे प्रशांत पंचभाई राज्य पुरस्काराने सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:49 IST
शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल तिवसा येथील राजीव गांधी विद्यालयाचे शिक्षक प्रशांत मधुकर पंचभाई यांना राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यवतमाळचे प्रशांत पंचभाई राज्य पुरस्काराने सन्मानित
ठळक मुद्देराजीव गांधी विद्यालयाचे शिक्षक प्रशांत मधुकर पंचभाई यांना राज्य पुरस्काराने सन्मानित