शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

उच्च न्यायालयात यवतमाळ नगरपरिषदेची याचिका खारिज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2015 02:12 IST

नगरपरिषदेतील ठेकेदाराकडे असलेल्या कंत्राटी कामगारांना वेतन दरापेक्षा कमी वेतन देण्यात येते.

यवतमाळ : नगरपरिषदेतील ठेकेदाराकडे असलेल्या कंत्राटी कामगारांना वेतन दरापेक्षा कमी वेतन देण्यात येते. या अन्यायाविरोधात हिंदु मजदूर किसान पंचायतीने कामगार आयुक्तांकडे दाद मागितली. कामगार आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना वेतन फरकाची रक्कम देण्याचे आदेश दिले. या आदेशाविरोधात नगरपरिषदेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने कंत्राटी कामगाराच्या बाजुने निकाल देत कामगार आयुक्तांचा निर्णय कायम ठेवला आहे. नगरपरिषदेत स्वच्छतेसाठी झटणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या कंत्राटदारांकडून आर्थिक शोषण केले जात होते. या कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार मोबदला देण्यात येत नव्हता. या अन्यायाबाबत नगरपरिषदेकडे सातत्याने दाद मागितल्यानंतरही पालिका प्रशासनाने सरळ कर्मचाऱ्यांची मागणी फेटाळून लावली. त्यामुळे १ जानेवारी २०१२ ते ३१ डिसेंबर २०१२ या कालावधीतील वेतन फरकाची रक्कम मिळण्यासाठी कमगारांनी मार्च २०१३ मध्ये सहाय्यक कामगार आयुक्तांकडे याचिका दाखल केली. यावर आयुक्तांनी २५ नोव्हेंबर २०१३ मध्ये कंत्राटी कामगारांना वेतन फरकाची रक्कम देण्याचा आदेश दिला. नगरपरिषदेने या आदेशाविरोधात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. याप्रकरणी १६ एप्रिल रोजी न्यायालयाने नगरपरिषदेची याचिका खारीज करून सहाय्यक कामगार आयुक्तांचा आदेश कायम ठेवला. कामगारांच्या हितासाठी हिंदु मजूर किसान पंचायतीचे विनोद शेंडे, मनोहर ताकतोडे, अभिजीत शिंदे, अजय गिरधर, रघुनाथ घरडे, रघुनाथ बांगर, बाळू खोब्रागडे, मोरेश्वर साखरे, नरेश बलवीर, विवेक अलोणे, पुंडलिक खोब्रागडे, अजगर शहा, सावित्री महातो, पंचफुला गाडेकर, दमडाबाई धुर्वे यांनी पुढाकार घेतला होता. उच्च न्यायालयात कामगारांच्या बाजुने अ‍ॅड़ जगदाळे व वासुदेव गजभिये यांनी युक्तीवाद केला. (कार्यालय प्रतिनिधी)