शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

माझी वसुंधरा अभियानात यवतमाळ पालिका राज्यात दुसरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 17:52 IST

Yavatmal : नगरपालिकेला मिळाले कोटींचे बक्षीस

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत स्पर्धा घेण्यात आली. हे अभियान राबविण्यात यवतमाळ नगर परिषद राज्यात दुसऱ्या क्रमांकाची ठरली आहे. यामुळे नगरपालिकेला पाच कोटींचे बक्षीस मिळाले आहे. यासोबतच जिल्ह्याचाही या अभियानात अमरावती विभागात दबदबा असून, पहिला क्रमांक मिळाला.

माझी वसुंधरा अभियान हे १ एप्रिल २०२३ ते ३१ मे २०२४ या कालावधीत राबविण्यात आले. १ ते ३ लाख लोकसंख्या असणाऱ्या नगर परिषदेच्या गटात यवतमाळ शहराने राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे. हे अभियान तत्कालीन मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांच्या काळात राबविण्यात आले होते. यासोबतच वणी व दारव्हा नगर परिषद, मारेगाव आणि बाभूळगाव नगर पंचायतीने अमरावती विभाग स्तरावर गुणांकन प्राप्त केले आहे. अमरावती विभागात जिल्ह्यातील तीन नगर परिषदा आणि दोन नगर पंचायती माझी वसुंधरा अभियानात गुणवत्तेत आल्या आहेत. 

राज्य शासनाने रोख पुरस्काराच्या विनियोगाची कार्यपद्धती निश्चित करून दिली आहे. यामध्ये ढोबळ मानाने बक्षिसाची ५० टक्के रक्कम शहरात हरित क्षेत्र वाढविण्यासाठी खर्च करावी लागणार आहे. तर ५० टक्के रक्कम पर्यावरणपूरक इतर उपाययोजनांसाठी वापरावी, इतर उपाययोजनांच्या रकमेतून १० टक्क्यांपर्यंतची रक्कम माझी वसुंधरा अभियानामध्ये शहर स्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धांच्या विजेत्यांना बक्षीस देण्यास मान्यता दिली आहे. 

ही कामे करता येणार बक्षिसाच्या रकमेतून जैवविवि- धतेच्या संवर्धनावर, जुन्या हरित क्षेत्राचे संवर्धन देखभाल, रोपवा- टिकांची निर्मिती, जलसंवर्धन उपक्रम, रेन वॉटर हार्वेस्टिंग, नदी, तळे व नाल्याचे पुनरुज्जीवन, सौर- ऊर्जेवर चालणारे पथदिवे, विद्युत वाहन, चार्जिंग पॉइंट अशा ठळक बाबींवर ही रक्कम खर्च करता येणार आहे.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ