शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ सर्वेक्षण अभियानात यवतमाळ पालिकेची मोहोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 23:48 IST

देशपातळीवर करण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात यवतमाळ नगरपरिषदेने आपली मोहर उमटविली आहे. नगरपरिषदेला पाच हजार गुणांपैकी २८८७ गुण मिळाले असून ९६ वा क्रमांक प्राप्त झाला आहे. केंद्र व राज्यस्तरीय चमू सर्वेक्षणासाठी शहरात दाखल झाली असता स्वच्छतेचा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आल्याचा हा परिणाम आहे.

ठळक मुद्देदेशात ९६ वा क्रमांक : २८८७ गुण, केंद्र व राज्यस्तरीय चमूंकडून गुणांकन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : देशपातळीवर करण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात यवतमाळ नगरपरिषदेने आपली मोहर उमटविली आहे. नगरपरिषदेला पाच हजार गुणांपैकी २८८७ गुण मिळाले असून ९६ वा क्रमांक प्राप्त झाला आहे. केंद्र व राज्यस्तरीय चमू सर्वेक्षणासाठी शहरात दाखल झाली असता स्वच्छतेचा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आल्याचा हा परिणाम आहे.स्वच्छ सर्वेक्षणअंतर्गत एकूण चार मुद्यांवर गुणांकन करण्यात आले. यामध्ये पहिल्या भागात सर्व्हिस लेव्हल प्रोग्रेस म्हणजेच पालिकेकडून दिल्या जाणाऱ्या सेवा आहे. यामध्ये यवतमाळला १२५० पैकी ४१४ गुण मिळाले. स्वच्छतेच्या सेवा कोणत्या देतो, सार्वजनिक शौचालय, झोपडपट्ट्या, शहरातील रस्ते, त्यावरचे पथदिवे यांचा समावेश सेवेअंतर्गत येतो. दुसरा मुद्दा हा सर्टिफिकेशनचा होता. यात ५०० गुण मिळाले. शहरासंदर्भातील योग्य व परिपूर्ण माहिती, कर्मचारी प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन, त्याला असलेला कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद, पालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांची कार्यशाळा या उपक्रमांचे जीपीएस टॅगिंगद्वारे फोटो काढणे अशा मुद्यांवर गुणांकन झाले. तिसरा मुद्दा हा डायरेक्ट आॅब्झर्व्हेशन प्रत्यक्ष पाहणी करणे, शहराला राज्य आणि केंद्रातील पथकांनी दोन वेळा भेटी दिल्या. स्वच्छतेच्या उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी केली. यात ९९७ गुण मिळाले. तर स्वच्छता अ‍ॅपच्या वापराबाबत ९७६ गुण मिळाले. यामध्ये नागरिकांचे अभिप्रायही घेण्यात आले. एकंदरच नगरपरिषदेच्या यंत्रणेने सलग चार महिने अहोरात्र राबून देशपातळीवर स्वच्छतेचे मानांकन मिळविले आहे. पहिल्या शंभरमध्ये येण्याचा बहुमानही भूषणावहच असल्याचे सांगण्यात येते.चार मुद्यांवर गुणांकनपालिकेकडून दिल्या जाणाऱ्या सेवा, शहराची परिपूर्ण माहिती, डायरेक्ट आॅब्झर्व्हेशन, स्वच्छता अ‍ॅप अशा चार मुद्यांवर केंद्र व राज्य पथकाच्या चमूने गुणांकन केले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका