यवतमाळ - येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे दोन वर्षांपासून फायर ऑडिट झाले नाही. २०१९ मध्ये फायर ऑडिट केल्यानंतर ज्या सुधारणा सांगितल्या होत्या. त्याचीही पूर्तता करण्यात आली नाही. औरंगाबाद येथील संस्थेने तयार केलेल्या आराखड्याप्रमाणे नव्या सुधारणेसाठी सहा कोटी दहा लाखांचा निधी आवश्यक आहे. तो मिळावा यासाठी महाविद्यालय प्रशासनाने पाठपुरावा केला. मात्र ती रक्कम अजूनही मिळालेली नाही. २८ वाॅर्ड व ७६५ खाटा असलेल्या रुग्णालयात पुरेशी अग्नीशमन यंत्रणा उपलब्ध नाही.
यवतमाळ ‘मेडिकल’चे दोन वर्षांपासून फायर ऑडिटच नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2021 16:11 IST