लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा प्रशासन येथे अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्यासाठी उपाययोजना करत आहे. याउलट स्थिती यवतमाळ जिल्ह्यातील बाहेर राज्यात अडकलेल्या मजुरांची आहे. घाटंजी तालुक्यातील भांबोरा येथील मजूर आंध्र प्रदेशातील गुंटूरमध्ये अडकून पडले आहे. आता त्यांची तेथे गैरसोय होत आहे.घाटंजी तालुक्यातील भांबोरा येथील तिघे, आर्णी तालुक्यातील आठ जण, यवतमाळ तालुक्यातील कारेगाव यावली येथील तीन जण, यवतमाळच्या वंजारी फैलातील एक जण असे १५ मजूर अडकून पडले आहेत. आंध्र प्रदेशातील इत्कुरी बायपास, पाटीपाडू रोड, सुबाराव पाटी मिल येथे हे मजूर अडकले आहे. आता त्याठिकाणी या मजुरांची लॉकडाऊनमुळे गैरसोय होत आहे. स्थानिक प्रशासनाने त्यांना गावी जाण्यासाठी ई-पास उपलब्ध करून दिली आहे. मात्र प्रवासाची कुठलीही साधने नाही. तेथून रेल्वे अथवा एसटी बसही सोडण्यात आली नाही. आता या मजुरांना दोन वेळच्या जेवणाची चिंता लागली आहे. मुलंबाळं सोबत असल्याने त्यांच्या अडचणी वाढतच आहे. या मजुरांना तातडीने स्वगृही आणण्यासाठी यवतमाळ जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करावे, अशी मागणी सहदेव राठोड यांनी केली आहे.
आंध्रात अडकले यवतमाळचे मजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 17:59 IST
यवतमाळ जिल्हा प्रशासन येथे अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्यासाठी उपाययोजना करत आहे. याउलट स्थिती यवतमाळ जिल्ह्यातील बाहेर राज्यात अडकलेल्या मजुरांची आहे. घाटंजी तालुक्यातील भांबोरा येथील मजूर आंध्र प्रदेशातील गुंटूरमध्ये अडकून पडले आहे. आता त्यांची तेथे गैरसोय होत आहे.
आंध्रात अडकले यवतमाळचे मजूर
ठळक मुद्दे१५ मजुरांपुढे जेवणाचा प्रश्नयवतमाळ, आर्णी, घाटंजी तालुक्यातील रहिवासी