ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. १८ - यवतमाळ जिल्हयामध्ये गुरुवारी सकाळी स्कूलव्हॅनला भीषण अपघात झाला. विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणा-या स्कूलव्हॅनला वडगाव फाटा वणी येथे ट्रकने धडक दिली. सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला.
या अपघातात चार मुलांचा मृत्यू झाला असून, ड्रायव्हरसह सहा जण जखमी झाले आहेत. दोघां मुलांचा जागीच मृत्यू झाला. दोन मुलांना रुग्णालयाच्या वाटेवर असताना मृत्यू झाला. श्रद्धा हलके, कुमार देवुलकर या मुलांचा जागीच मृत्यू झाला. श्रुतिका ढोके, निशांत देवुलकर, प्रदीप हलके, हर्शल इंगोले या चार विद्यार्थ्यांना लोढा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.