शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

ती लग्नापूर्वीच ठरली उष्माघाताचा बळी, विवाहापूर्वीचे देवदर्शन उठले जीवावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 19:41 IST

जीवाची लाही लाही करणारं उनं रोजच्या दिवसाला तापत आहे. आग ओकणारे सूर्यतेज ४६ डिग्रीच्या वरील तापमान घेऊन दिवसाची सुरुवात करीत आहे.

यवतमाळ - जीवाची लाही लाही करणारं उनं रोजच्या दिवसाला तापत आहे. आग ओकणारे सुर्यतेज ४६ डिग्रीच्या वरील तापमान घेऊन दिवसाची सुरुवात करीत आहे. त्यामुळे मानवी जीवन कमालीचे विस्कळीत झालेले आहे. घराबाहेरील कामे दिवसा करणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण दिल्यासारखे आहे. त्यामुळे दिवसा शहरातील रस्ते कमालीचे स्तब्ध झालेले दिसत आहे. अशा दिवसात बाहेर देवदर्शनाला जाने एका उपवर मुलीच्या मृत्यूचे कारण ठरले. आर्णी तालुक्यातील भंडारी (जहागीर) येथील रघुनाथ शिंदे यांची मुलगी कु. कल्पना हिचा विवाह तालुक्यातील परसोडा येथील अनिल सोळंके या मुलाशी सामाजीक रितीरिवाजाप्रमाणे ठरला. मार्च महिन्यात त्यांचा साखरपुडा झाला. दिवाळी नंतर २० फेब्रुवारी २० रोजी लग्नाची तारीख निश्चित झाली. त्यांच्या सामाजीक परंपरे नुसार मुलीचे लग्न जुळल्यावर देवकार्य पार पाडण्यासाठी कुळदैवताच्या पायथ्याशी जावे लागते. त्यामुळे ता. २५ एप्रिल रोजी खाजगी गाडी करून  उपवर मुलगी व सोबत आई वडील, काका काकु, दोन भाऊ, आजी व विवाह समंध जुळवणारे सिध्दु महाराज शिंदे हे कोल्हापूर, जेजुरी, नातेपोते, नाथबाबा येथे गेले होते. उपवर मुलीचे लग्नापूर्वीचे दैविक कार्य आटोपून घरी परत येत असतानांच कल्पनाला उनं लागली. तीला उलट्या येऊ लागल्या म्हणून तुळजापूर येथील खाजगी रूग्णालयात दाखल करून उपचार करून घराकडे निघाले. प्रवासात तीचा त्रास वाढला. तेव्हा नांदेड पोहचले होते.तिला नांदेड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.तीथे उपचार केला परंतु उष्माघाताचा आघात जास्त असल्यामुळे तीच्यावर उपचार होऊ शकला नाही. अखेर तिला मरणाने कवटाळले.  ३० एप्रिल रोजी सकाळी चार वाचता प्रवासादरम्यान तीचा मृत्यू झाला. देवदर्शनाला गेलेल्या उपवर मुलिचा उष्माघाताने बळी घेतला. ही तालुक्यातील पहिली घटना घडली. या घटनेमुळे कल्पना व अनिल यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. दोन जीवाच्या मनोमिलनाला नियतीने पोरकेच ठेवले. ही घटना परिसरातील नागरिकांच्या मनाला हळहळ व्यक्त करनारी ठरली. तर उपवर अनिलला कायम दुखा:त झोकुन गेली.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ