शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

यवतमाळकरांना यावर्षीही बेंबळाचे पाणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 22:01 IST

नऊ महिन्यात केवळ पाच किलोमीटर पाईप टाकले. आणखी तेरा किलोमीटर बाकी आहे. कंपनीचे पाईप थांबून थांबून येत आहे. टाकणारेही थंड आहे. फिल्टर प्लान्टचे काम केवळ ५५ टक्के झाले. शिवाय लाईन मार्गातील शेतात पिके आहेत.

ठळक मुद्दे१८ पैकी केवळ पाच किमी पाईप टाकले : शेतातून पाईप नेण्यास शेतकऱ्यांचा विरोध

विलास गावंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नऊ महिन्यात केवळ पाच किलोमीटर पाईप टाकले. आणखी तेरा किलोमीटर बाकी आहे. कंपनीचे पाईप थांबून थांबून येत आहे. टाकणारेही थंड आहे. फिल्टर प्लान्टचे काम केवळ ५५ टक्के झाले. शिवाय लाईन मार्गातील शेतात पिके आहेत. या परिस्थितीत बेंबळा प्रकल्पाचे पाणी याहीवर्षी यवतमाळकरांना मिळणार नाही, हे स्पष्ट आहे.निळोणा झाल्यानंतर यवतमाळकरांना गतवर्षी न भूतो अशा पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले. लिटरभर पाण्यासाठी तास-दोन तास रांगेत राहावे लागले. आबालवृध्द पाण्यासाठी भटकत होते. गरीब-श्रीमंतीचा भेदही थांबला होता. अपुऱ्या पावसामुळे निळोणा आणि चापडोह प्रकल्प बंद कोरडे पडल्याने हे संकट उभे झाले होते. त्याचवेळी यवतमाळकरांच्या भावनांशी खेळ खेळला गेला. ३०२ कोटींच्या ‘अमृत’ योजनेचे पाणी टंचाई काळात यवतमाळकरांना पाजणार, अशा घोषणा सुरू झाल्या. पाईपलाईन टाकून पूर्ण झाली, पण टेस्टिंगमध्येच दगा दिला. अनेक ठिकाणी पाईपच्या चिंधड्या उडाल्या. वल्गना करणाऱ्यांचे तोंड बंद झाले.बेंबळाचे पाणी मिळणार नाही, यावर जून २०१८ मध्ये मोहोर लागली. पाऊस लवकर सुरू झाल्याने टंचाई संपली. पण बेंबळा पूर्णत्वाकडे जाण्याची टंचाई अजूनही कायम आहे. निकृष्ट पाईप पुरविले, पोलिसात तक्रार करा, नवीन पाईप मागा, अशी सारी सोंग ढोंग त्यावेळी झाली. कंपनी अखेर नवीन पाईप देण्यास राजी झाली. मात्र जीवावर आल्यागत पाईपचा पुरवठा केला जात आहे. आतापर्यंत किमान नऊ किलोमीटर पाईप पोहोचणे अपेक्षित होते. केवळ चार किलोमीटरचा पुरवठा झाला. यातून काही ठिकाणी जागा सोडून असे पाच किलोमीटर काम झाले. अर्धीअधिक पाईपलाईन शेतातून गेली आहे. आता तिथे पीक आहे. मागील अनुभव पाहता शेताची नासाडी होऊ देण्याची शेतकºयांची मानसिकता नाही. टाकलेले पाईप काढून नवीन पाईप टाकण्यासाठी आवश्यक तेवढे मनुष्यबळ कंत्राटदाराकडून लावले जात नाही. आहे तेवढ्यात भागविणे सुरू आहे. टाकळी फिल्टर प्लान्टपर्यंत संपूर्ण १८ किलोमीटर पाईप टाकणे अवघ्या दोन महिन्यात कठीण आहे.फिल्टर प्लान्ट ते गोदनी रोड सम्पचीही बोंबाबोंबमोठी उठापटक करून पाईप टाकले तरी, शुध्द पाणी मिळणार नाही. कारण टाकळी येथे फिल्टर प्लान्टचे काम फक्त ५५ टक्के झाले आहे. या प्लान्टवर दररोज ४८ दशलक्ष लीटर पाण्याचे शुध्दीकरण होणार आहे. तेथून गोदणी रोडवरील टाकीत पाणी साठवण केली जाईल. मात्र ही सोय यावर्षी तरी होणार नाही, हे स्पष्ट आहे. फिल्टर प्लान्टपासून गोदनी रोडवरील सम्पमध्ये पाणी आणण्यासाठी टाकलेल्या सात किलोमीटर लाईनचीही बोंबाबोंब आहे. या लाईनचे टेस्टिंग पूर्ण झालेले नाही. पाण्याची साठवण करण्यासाठी सम्पच्या कामाला हात लागलेला नाही. आता बेंबळाचे पाणी यवतमाळकरांना या उन्हाळ्यात मिळणारच नाही. पुढे आणखी किती महिने लागणार याविषयीसुध्दा अनिश्चितता आहे.योजनेची डेडलाईनला अवघे काही महिने‘अमृत’ योजनेचे काम पूर्ण करण्याची डेडलाईन आॅक्टोबर २०१९ पर्यंत आहे. नागरिकांच्या घरापर्यंत पाणी नेण्यासाठीचा हा कालावधी आहे. आजपावेतो पाईपलाईन झालेली नाही, फिल्टर प्लान्ट अपूर्ण आहे. शहरात पाईपचे जाळे पसरले नाही. १६ टाक्यांचे काम झालेले नाही. काही ठिकाणची कामे थांबलेली आहेत. कामाची गती अतिशय संथ आहे. या परिस्थितीत डेडलाईनपर्यंत योजना पूर्ण होईल, याविषयी साधार शंका आहे.शहराची पाण्याची गरज पूर्ण होईल एवढे पाणी निळोणा आणि चापडोहमध्ये आहे. अमृत योजना पूर्ण झाल्यानंतर बेंबळाचे पाणी यवतमाळकरांना मिळणारच आहे. ठरलेल्या मुदतीत योजना पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न आहे.- मदन येरावार,पालकमंत्री, यवतमाळबेंबळाचे नवीन पाईप सहा किलोमीटरपर्यंत टाकले आहे. कंपनीकडून अपेक्षेप्रमाणे पाईपचा पुरवठा नाही. शिवाय इतरही अडचणी आहेत. यातून मार्ग काढत शहरात लवकरच पाणी आणले जाईल.- अजय बेले, उपविभागीय अभियंता, मजीप्रा यवतमाळ.

टॅग्स :Bembla Damबेंबळा धरणwater transportजलवाहतूक