शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूलाही ‘किक’ मारणारा यवतमाळचा फुटबॉलपटू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2018 21:52 IST

सध्या जगभरात ‘फुटबॉल फिव्हर’ला उधाण आले आहे. पण फुटबॉलवर जीव जडलेला यवतमाळातील एक पट्टीचा खेळाडू दोन्ही किडन्या गमावूनही मैदानावर पराक्रम गाजवितो आहे.

ठळक मुद्देदोन्ही किडन्या निकामी : आईने दिली किडनी अन् मित्रांनी लावला पैसा, पोलीस स्पर्धा गाजविल्या

नीलेश भगत।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सध्या जगभरात ‘फुटबॉल फिव्हर’ला उधाण आले आहे. पण फुटबॉलवर जीव जडलेला यवतमाळातील एक पट्टीचा खेळाडू दोन्ही किडन्या गमावूनही मैदानावर पराक्रम गाजवितो आहे. आईने दिलेली किडनी आणि मित्रांनी शस्त्रक्रियेसाठी दिलेला पैसा त्याच्यासाठी ‘चिअरिंग’ ठरला. अन् फुटबॉल खेळण्याच्या अतिव इच्छेमुळे त्याला मृत्यूला ‘पेनॉल्टी किक’ मारता आली. राज्य स्पर्धेत ‘बेस्ट डिफेन्स’चा पुरस्कार पटकाविणारा व विद्यापीठ स्तरीय स्पर्धा गाजविणारा हा खेळाडू आहे, यवतमाळ पोलीस दलातील कवायत निर्देशक निकेश रमेशचंद्र जयस्वाल!सूरजनगरातील निकेश मोठा भाऊ सचिनचा खेळ पाहून शालेय जीवनापासून फुटबॉल खेळू लागला. १९९८ मध्ये राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत त्याने पहिले सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर राज्यस्तरीय व अमरावती विद्यापीठ स्तरावर दोन वेळा प्रतिनिधीत्व केलेल्या निकेशने २००६ मध्ये महाराष्ट्र पोलीस दलात स्पोर्ट्स कोट्यातून कॉन्स्टेबलची नोकरी मिळविली. त्याची पहिली नियुक्ती भंडाऱ्यात झाली. पोलीस प्रशिक्षणानंतर महाराष्ट्र स्टेट पोलीस गेमसाठी त्याला मुंबई येथे बोलाविण्यात आले. चार वर्षे त्याने या स्पर्धा गाजविल्या. दोन्ही पायांनी सारख्याच ताकदीने खेळणारा निकेश पोलीस स्पर्धांमध्ये चांगलाच लोकप्रिय झाला. २०११ मध्ये ‘लोकमत’तर्फे आयोजित एनपीएल स्पर्धेत ‘सात्विक बुल्स नागपूर’ संघात तो खेळला. ही गाजलेली स्पर्धा सात्विक बुल्सनेच जिंकली, हे विशेष.दरम्यान, दोन्ही किडणी निकामी झाल्यावर किडणी प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नव्हता. यासाठी १० ते १२ लाखांचा खर्च होता. पोलीस विभागाच्या आरोग्य कुटुंब कल्याण योजनेतून काही खर्च होणार होता. आई सविता जयस्वाल यांनी आपली एक किडणी मुलाला देण्याची तत्काळ तयारी दर्शविली. प्रश्न होता आॅपरेशनसाठी उर्वरित रक्कम जुळविण्याचा. त्यासाठी निकेशचे मित्रमंडळ धावून आले. नेहरु स्टेडियम येथील फुटबॉल खेळाडू, भंडारा पोलीस मित्र व यवतमाळ पोलीस दलाने पैसे गोळा करून मोठी रक्कम निकेशला दिली.मुंबईत किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. हळूहळू सामान्य झाल्यावर निकेशमधील फुटबॉलपटू पुन्हा मैदानावर येण्यासाठी धडपडू लागला. दररोज फिरणे व जॉगिंग केल्यानंतर तो ज्येष्ठ फुटबॉलपटूंसोबत खेळू लागला. जिद्द व फुटबॉलचे वेड यामुळे तो आता स्पर्धाही खेळू लागला आहे. अमरावती, दारव्हा परिक्षेत्रीय पोलीस स्पर्धा, वर्धा येथील स्पर्धेत त्याने भाग घेतला. आताही तो दररोज १ तास फुटबॉल खेळतो आणि उदयोन्मुख खेळाडूंना मार्गदर्शनही करतो.डॉक्टर, मी पुन्हा खेळू शकेल का हो ?फुटबॉलमध्ये निकेशची कारकीर्द उत्तरोत्तर बहरत होती. डिसेंबर २०१२ ला त्याचे लग्न झाले. २०१३ च्या डिसेंबरमध्ये चांदूररेल्वे येथे बंदोबस्तासाठी गेल्यावर निकेशला अचानक अस्वस्थ वाटू लागले. तो धामणगाव येथील डॉक्टरांकडे गेला. रक्तदाब खूप वाढला होता. डॉक्टरांनी यवतमाळला खासगी दवाखान्यात ‘रेफर’ केले. येथील डॉक्टरांनी चाचण्या करून नागपूरला ‘रेफर’ केले. तेथे पुन्हा चाचण्या झाल्या अन् निकेशच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे निदान झाले. हे कळताच एखाद्या रूग्णाने विचारले असते, मी वाचणार का? पण निकेशने एकच प्रश्न केला, ‘डॉक्टर, मी पुन्हा फुटबॉल खेळू शकेल का?’ फुटबॉल खेळावरील हे प्रेम पाहून डॉक्टरही अचंबित झाले.

टॅग्स :FootballफुटबॉलYavatmalयवतमाळ