लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नेर तालुक्यातील एका गावात पुणे येथील वर पक्षाकडील मंडळी शनिवारी मुलगी बघण्यासाठी आले होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपवधू पक्षाकडील मंडळींनी त्यांना गावाबाहेर अडवून परतवून लावले.जिल्ह्यात तीन कोरोना बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे प्रशासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या. जिल्ह्यात सर्वत्र लॉक डाऊनची स्थिती निर्माण झाली. अशात नेर तालुक्यातील एका गावात काही पुणेकर मंडळी एका महिलेसह मुलगी बघायला आले. मुलीकडच्यांना माहिती मिळताच त्यांनी या मंडळीला गावाबाहेरच अडविले. तेथूनच त्यांना पुणे येथे परत पाठविण्यात आले. विशेष म्हणजे ग्रामीण भागात पुण्यात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण असल्याची अफवा पसरली आहे. त्यामुळे तालुक्यातील या गावातील मुलीकडच्या मंडळींनी पुणेकरांना गावात शिरण्यास मज्जाव केला.
coronavirus; यवतमाळ जिल्ह्यात मुलगी बघायला आलेल्या पाहुण्यांना गावाबाहेरच अडवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 13:55 IST
नेर तालुक्यातील एका गावात पुणे येथील वर पक्षाकडील मंडळी शनिवारी मुलगी बघण्यासाठी आले होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपवधू पक्षाकडील मंडळींनी त्यांना गावाबाहेर अडवून परतवून लावले.
coronavirus; यवतमाळ जिल्ह्यात मुलगी बघायला आलेल्या पाहुण्यांना गावाबाहेरच अडवले
ठळक मुद्देनेर तालुक्यातील घटना