लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : केंद्र शासनाने राबविलेल्या सामुदायिक शौचालय अभियानात यवतमाळ जिल्ह्याने देशातून चौथा तर राज्यातून दुसरा क्रमांक पटकाविला. जळगाव पहिल्या तर भंडारा जिल्हा पाचव्या स्थानावर आहे.केंद्र शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाने १५ सप्टेंबर २०१९ ते १९ जून २०२० या कालावधीत सामुदायिक शौचालय अभियान राबविले. या अभियानात यवतमाळ जिल्ह्याला ४४२ सामूदायिक शौचालय मंजूर करण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत या उपक्रमाची जिल्ह्यात सुरुवात करण्यात आली. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधर यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्याने ४४२ पैकी ३०० सामूदायिक शौचालय पूर्ण केले. उर्वरित कामे प्रगतिपथावर आहे.या शौचालयांची पाहणी केल्यानंतर केंद्र शासनाने रँकिंग निश्चित केले. त्यात यवतमाळ जिल्ह्याने देशात चौथा तर राज्यात दुसरा क्रमांक मिळविला. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी पुरवठा व स्वच्छता) मनोज चौधर यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली.महिला व पुरुषांसाठी प्रत्येकी दोन युनिटसामूदायिक शौचालयात महिला व पुरुषांसाठी प्रत्येकी दोन युनिटची निर्मिती केली. त्यात शासनाचे एक लाख ८० हजार अनुदान तर उर्वरित २० हजारांचा निधी लोकवर्गणी स्वरूपात आहे.बोरीअरब देशात तिसरेजिल्ह्याच्या दारव्हा तालुक्यातील बोरीअरब ग्रामपंचायतीने देशात तिसरा क्रमांक मिळविला. २ ऑक्टोबरला बोरीच्या सरपंच ममता ओमप्रकाश लढ्ढा यांना जिल्हा स्तरावरच ऑनलाईन पद्धतीने गौरविले जाणार आहे.
सामुदायिक शौचालय अभियानात यवतमाळ जिल्हा देशात चौथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 14:13 IST
Public Toilet, Yawatmal News केंद्र शासनाने राबविलेल्या सामुदायिक शौचालय अभियानात यवतमाळ जिल्ह्याने देशातून चौथा तर राज्यातून दुसरा क्रमांक पटकाविला.
सामुदायिक शौचालय अभियानात यवतमाळ जिल्हा देशात चौथा
ठळक मुद्दे२ ऑक्टोबरला सरपंचांसह लोकप्रतिनिधींचा गौरव