शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

का नाही मिळाली भरपाई, अखेर झाले कारण स्पष्ट

By विलास गावंडे | Updated: March 13, 2023 15:00 IST

मल्टीसर्व्हिसेस सेंटरला दणका : यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगाची चपराक

यवतमाळ : पैशांची जुळवाजुळव करून शेतकऱ्याने पीक विमा काढला. अतिवृष्टी व रोगराईमुळे ज्वारी पिकाचे नुकसान झाले. विम्याची भरपाई मिळेल, अशी आशा असतानाच धक्का देणारी बातमी कानावर पडली. ज्वारीचा विमा काढलाच नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. अखेर कारण स्पष्ट झाले. जिल्हा ग्राहक आयोगाने मल्टीसर्व्हिसेस सेंटरला दणका दिला. शेतकऱ्याला नुकसानभरपाई देण्याचा आदेश देण्यात आला.

कळंब तालुक्यातील हिवळणी येथील अंकुश तुकाराम राठोड यांनी त्यांच्या हिवळणी (खु.) व पिंपळगाव (इ) शिवारात असलेल्या शेतातील सर्व पिकांचा विमा काढण्यासाठी पुसद येथील पवार मल्टीसर्व्हिसेस ॲण्ड ऑनलाइन सेंटरमधून आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केली. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून विमा काढण्यात आला. ऑनलाइन सेंटर चालकानेही राठोड यांच्या सर्व पिकांचा विमा काढला असल्याचे सांगून पावत्याही दिल्या.

पावसामुळे शेतीपिकाचे नुकसान झाल्याने राठोड यांनी विम्याच्या भरपाईकरिता प्रक्रिया सुरू केली. तेव्हा त्यांना ज्वारी पिकाचा विमा काढलाच नसल्याचे सांगितले गेले. ही बाब चौकशीअंती खरी ठरली. सर्व्हिसेस सेंटरने राठोड यांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगाकडे तक्रार करण्यात आली. आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार वाघमारे व सदस्य हेमराज ठाकूर यांच्या उपस्थितीत सुनावणी झाली. अंकुश राठोड यांना सर्व्हिसेस सेंटरने नुकसानभरपाई द्यावी, असा आदेश देण्यात आला.

नऊ टक्के व्याजासह भरपाई

अंकुश राठोड यांनी पिकाच्या नुकसानाची एक लाख १५ हजार २०० रुपये भरपाई आणि शारीरिक व मानसिक त्रासापोटी ५० हजार रुपये मिळावेत, अशी विनंती आयोगाकडे केली होती. आयोगाने पीक विम्याची भरपाई वीस हजार रुपये नऊ टक्के व्याजासह आणि तक्रार खर्चाचे तीन हजार रुपये देण्याचा निर्णय दिला आहे. सर्व्हिसेस सेंटरचे संचालक विशाल पवार हे मात्र सुनावणी सुरू असताना आयोगापुढे हजर झाले नव्हते.

टॅग्स :Courtन्यायालयconsumerग्राहकYavatmalयवतमाळ