लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दारूड्या पित्याकडून वारंवार आईच्या चारित्र्यावर संशय घेवून शिवीगाळ केली जात होती. रविवारी रात्री यातूनच संतापलेल्या मुलाने ७० वर्षीय वडिलाच्या डोक्यात कुऱ्हाड घालून जिवानिशी ठार केले. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील पिंपळगाव परिसरातील बुटले ले-आऊटमध्ये घडली.रामचंद्र रामदयाल ठाकरे (७०) असे मृताचे नाव आहे, तर अरुष रामचंद्र ठाकरे (३५) असे आरोपी मुलाचे नाव आहे. रोजमजुरी करणाऱ्या ठाकरे कुटुंबात आई, मुलगा व वडील असे तिघे जण राहात होते. रविवारी रामचंद्र ठाकरे दारू पिवून घरी आले. त्यांनी पत्नी लीला (६०) हिला चारित्र्यावर संशय घेवून शिवीगाळ सुरू केली. पतीच्या या वागण्याला कंटाळून लीला ठाकरे घराबाहेर पडल्या, तर पतीने त्यांना चौकात अडवून तिथेही अश्लील शिवीगाळ सुरू केली. हा प्रकार मुलगा अरुष याला सहन झाला नाही. त्याने घरातून कुऱ्हाड काढून वडिलांच्या डोक्यावर तीन घाव घातले. यात रामचंद्र ठाकरे जागेवरच कोसळले. नंतर मुलाने व आईने जखमीला घरात नेले. तेथेच त्याची प्राणज्योत मावळली. मुलाने घटनेच्या ठिकाणी सांडलेल्या रक्तावर पाणी टाकून ते साफ केले. दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस जखमीला दवाखान्यात घेवून गेले असता तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले.पोलिसांनी अरुष रामचंद्र ठाकरे याला अटक करून त्याच्याजवळून कुऱ्हाड जप्त केली. याप्रकरणी लीला ठाकरे यांच्या तक्रारीवरून मुलाविरूद्ध भादंवि ३०२ कलमानुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
यवतमाळ जिल्ह्यात मुलाने केला दारूड्या पित्याचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 14:02 IST
दारूड्या पित्याकडून वारंवार आईच्या चारित्र्यावर संशय घेवून शिवीगाळ केली जात होती. रविवारी रात्री यातूनच संतापलेल्या मुलाने ७० वर्षीय वडिलाच्या डोक्यात कुऱ्हाड घालून जिवानिशी ठार केले. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील पिंपळगाव परिसरातील बुटले ले-आऊटमध्ये घडली.
यवतमाळ जिल्ह्यात मुलाने केला दारूड्या पित्याचा खून
ठळक मुद्देपिंपळगावातील घटनाआईच्या चारित्र्यावर संशय घेतल्याचा संताप