शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

10 मृत्युसह यवतमाळ जिल्ह्यात 441 जण पॉझिटिव्ह, 351 जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 18:47 IST

कोरोना हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 351 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

यवतमाळ : गत 24 तासात जिल्ह्यात 10 मृत्युसह 441 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोरोना हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 351 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 57 व 58 वर्षीय पुरुष आणि 43 व 74 वर्षीय महिला, महागाव तालुक्यातील 50 व 60 वर्षीय पुरुष, दारव्हा तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष, नेर तालुक्यातील 45 वर्षीय महिला, उमरखेड येथील 73 वर्षीय पुरुष आणि मानोरा (जि. वाशिम) येथील 40 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच आज (दि.31) पॉझेटिव्ह आलेल्या 441 जणांमध्ये 276 पुरुष आणि 165 महिला आहेत. यात यवतमाळातील 163, पुसद 68,  उमरखेड 41, वणी 27, दिग्रस 25, दारव्हा 21,  आर्णि 18, महागाव 14, घाटंजी 13, नेर 11, पांढरकवडा 9, झरीजामणी 8, मारेगाव 7, कळंब 6, बाभुळगाव 2, राळेगाव 1 आणि इतर शहरातील 7 रुग्ण आहे.

बुधवारी एकूण 4098 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 441 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 3657 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2489 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 1135 तर गृह विलगीकरणात 1354 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 28577 झाली आहे. 24 तासात 351 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 25433 आहे. तर जिल्ह्यात एकूण 655 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 269151 नमुने पाठविले असून यापैकी 262039 प्राप्त तर 7112 अप्राप्त आहेत. तसेच 233462 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसYavatmalयवतमाळ