शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

यवतमाळात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना नर्सेसने बांधल्या राख्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 16:24 IST

यवतमाळात पीपीई किट घालून येथे भरती असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना नर्सेसने राख्या बांधून अनोखी भेट दिली.

ठळक मुद्देशासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मानवतेचा परिचय

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी जिल्हा प्रशासनासह संपूर्ण आरोग्य यंत्रणा तेवढयाच क्षमतेने लढत आहे. भरती असलेल्या रुग्णाला कोरोनामुक्त करणे, हे एकच ध्येय आरोग्य यंत्रणेने ठेवले आहे. एवढेच नाही तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासोबतच रुग्णांसोबत असलेले ऋणानुबंध जपण्यावर भर दिला जात आहे. येथे भरती असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना रक्षाबंधननिमित्त राख्या बांधून येथील नर्स स्टॉफने मानवतेचा परिचय दिला आहे.गत सहा महिन्यांपासून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय व ग्रामस्तरावरील सर्व यंत्रणा) रुग्णसेवेत स्वत:ला झोकून दिले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल होणा-या प्रत्येक व्यक्तिचा जीव वाचला पाहिजे, यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. तसेच भरती असलेला प्रत्येक जण कोरोनामुक्त झाला पाहिजे, असाच त्यांचा मानस आहे. यात सण, उत्सवाची पर्वा न करता निरंतर सेवा सुरु आहे. घरी सण साजरा न करता येथील कोरोनाबाधित रुग्णांसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा करण्याचा निर्णय येथील संपूर्ण नर्सने घेतला. त्यानुसार पीपीई किट घालून येथे भरती असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना या नर्सने राख्या बांधून अनोखी भेट दिली. यावेळी सर्व नर्सने आस्थेवाईपने रुग्णांची विचारपूस करून त्यांच्या हातावर राखी बांधली तसेच रुग्णांचे आशिर्वादसुध्दा घेतले.स्वत:च्या जीवाची पर्वा न करता मानवतेच्या भावनेतून उपचार : रुग्णाच्या नातेवाईकाची प्रतिक्रियाकोरोनाबाधित रुग्णांना दिलासा देण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील संपूर्ण डॉक्टर्स व स्टाफ स्वत:च्या जीवाची पर्वा न करता मानवतेच्या भावनेतून उपचार करीत असल्याची प्रतिक्रिया कोरोनाबाधित रुग्णाच्या नातेवाईकाने दिली आहे. याबाबत त्यांनी पत्र लिहून महाविद्यालयाच्या प्रशासनाचे आभार मानले आहे. दर्यापूर, जि. अमरावती येथील वैद्यकीय प्रतिनिधी, त्यांची पत्नी व लहान भाऊ असे तिघेही जण 18 जुलै 2020 रोजी येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले. कारण त्यांच्या लहान भावाला कोरोनासदृष्य लक्षणे होती. त्याचा रिपोर्टसुध्दा पॉझेटिव्ह आला होता. त्यामुळे कोरोनाबाधित व्यक्तिच्या अत्यंत निकटच्या संपकार्तील असल्यामुळे रुग्णाचा मोठा भाऊ आणि त्याची वहिनीसुध्दा भरती झाले. योग्य उपचारानंतर वैद्यकीय प्रतिनिधीला व त्यांच्या पत्नीला महाविद्यालयातून सुट्टी देण्यात आली. तर त्यांचा लहान भाऊ जो कोरोनाबाधित आहे, त्याच्यावर अजूनही वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान डॉक्टरांनी घेतलेली मेहनत, मानवतेच्या भावनेतून केलेली सेवा या सर्व बाबी सुट्टी झाल्यानंतर वैद्यकीय प्रतिनिधी असलेल्या व्यक्तिने पत्राद्वारे महाविद्यालयाला कळविले आहे. येथील अधिष्ठाता डॉ. आर.पी.सिंह, कोरोना नियंत्रण समन्वयक डॉ. मिलिंद कांबळे यांच्यासह सर्व डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय, आया, मावशी, सफाई कामगार सगळे जण अगदी मनापासून स्वत:च्या जीवाची तमा न बाळगता रुग्णसेवेत पूर्णपणे झोकून काम करीत आहे. कुठेही जात, पात, धर्म, पंथ, उच्च, नीच असा भेदभाव आढळला नाही. विशेष म्हणजे मेडीसीन विभाग, एक्स-रे विभाग, छातीच्या उपचाराचा विभाग व इतर विभागामध्येही अतिशय चांगला समन्वय पाहायला मिळाला. औषधी, मानवता व सहकार्य यांचा त्रिवेणी संगम वैद्यकीय महाविद्यालयात अनुभवायला मिळाला. गत 40 वर्षांपासून वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून या क्षेत्रात कार्यरत आहो, मात्र येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान आलेला सुखद अनुभव मनाला भावून गेला, असेही दर्यापूर येथून व्यक्तिने पत्राद्वारे कळविले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaksha Bandhanरक्षाबंधन