शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
4
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
5
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
6
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
7
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
8
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
9
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
10
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
11
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
12
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
13
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
14
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
15
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
18
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
19
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
20
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

यवतमाळ बंद संमिश्र

By admin | Updated: January 8, 2015 23:01 IST

शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध करण्यासाठी पुकारलेल्या यवतमाळ बंदला गुरुवारी संमिश्र प्रतिसाद मिळाला. नेताजी मार्केट, दत्त चौक, मेनलाईन, इंदिरा गांधी मार्केट

एसटी बसवर दगडफेक : अतिक्रमण हटाव मोहिमेचा निषेध यवतमाळ : शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध करण्यासाठी पुकारलेल्या यवतमाळ बंदला गुरुवारी संमिश्र प्रतिसाद मिळाला. नेताजी मार्केट, दत्त चौक, मेनलाईन, इंदिरा गांधी मार्केट वगळता बंदचा प्रभाव दिसला नाही. दरम्यान नेताजी चौकात एसटी बसवर झालेली दगडफेकीची घटना वगळता बंद शांततेत पार पडला. पोलिसांनी शहरात सकाळपासूनच चोख बंदोबस्त लावला होता. तर पोलीस बंदोबस्त नसल्याचे कारण देत प्रशासनाने गुरुवारी अतिक्रमण हटाव मोहीम थांबविली होती. यवतमाळ शहरात शनिवार ३ जानेवारीपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली. प्रशासनाचा बुलडोझर व्यावसायिकांच्या अतिक्रमणावर चालत आहे. यामुळे अनेक गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त होत आहे. या अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध करण्यासाठी विदर्भ अन्याय निवारण समिती, फुटपाथ दुकानदारसंघ आणि फॉरर्वड ब्लॉकने संयुक्तरीत्या बंद पुकारला होता. गुरुवारी सकाळी माजी खासदार जांबुवंतराव धोटे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. नेताजी चौकातून निघालेला हा मोर्चा मुख्य बाजारपेठेतून मार्गक्रमण करीत पुन्हा नेताजी चौकात आला. व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने बंद करण्याचे आवाहन मोर्चेकऱ्यांनी केले होते. मोर्चात माजी आमदार विजयाताई धोटे, लालजी राऊत, क्रांती राऊत, प्रभाकर काळे, शेख जाकीर, गुलाब सोळंकी, श्रीराम खिरेकर, मुकुंद दंदे, शशी यादव, प्रणेश पिलोमन, बापू डोळे, लता ढोबरे, पौर्णिमा चव्हाण, ज्योती ओंकार, शाहीन परवीन, रत्ना काजळे, शोभा गेडाम यांच्यासह शेकडो व्यावसायिक सहभागी झाले होते. नेताजी मार्केट, मेनलाईन, इंदिरा गांधी मार्केट आणि दत्त चौक परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला. मात्र आर्णी व दारव्हा मार्गावरील अनेक दुकाने अर्धे शटर लावून सुरू होते. दुपारनंतर तर या मार्गावरील संपूर्ण व्यवहार सुरू होते. (कार्यालय प्रतिनिधी)