शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
Pahalgam Terror Attack : 'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
3
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
4
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
5
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
6
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
7
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
8
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
9
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
10
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
11
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
12
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
13
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
14
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
15
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
16
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
17
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
18
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
19
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
20
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार

यवतमाळात काँग्रेस, राष्ट्रवादीसह १९ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

By admin | Updated: October 19, 2014 23:19 IST

यवतमाळ विधानसभेत भाजप आणि शिवसेनेच्या काट्याच्या लढतीत बसपालाच केवळ आपले डिपॉझिट कायम राखता आले. सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसह १९ विविध

यवतमाळ : यवतमाळ विधानसभेत भाजप आणि शिवसेनेच्या काट्याच्या लढतीत बसपालाच केवळ आपले डिपॉझिट कायम राखता आले. सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसह १९ विविध पक्षांच्या उमेदवारांना आपले डिपॉझिटही राखता आले नाही. यवतमाळ विधानसभेची निवडणूक ही चौरंगी होणार अशी शक्यता सुरुवातीला वर्तविली जात होती. मात्र मतदारांनी आपला कौल भाजप आणि शिवसेना उमेदवाराच्या बाजूने लावल्यामुळे सर्व अंदाज चुकीचे ठरले. विधानसभेच्या इतिहासात प्रथमच बसपाच्या उमेदवाराला सर्वाधिक मते मिळाली आहे. मो. तारिक समी यांना ३४ हजार ४९८ इतकी मते मिळाली. मात्र बसपाच्या या कामगिरीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना आपले डिपॉझिट कायम राखणे शक्य झाले नाही. काँग्रेसने येथील आमदार नंदिनी पारवेकर यांचे तिकीट कापून राहुल ठाकरे यांच्या माध्यमातून नवीन चेहरा देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना अनामत कायम ठेवता येईल इतकीही मते मिळाली नाही. त्यांना ३१ हजार १५२ मते मिळाली. जिल्हा परिषद, नगरपरिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थेत वैशिष्ट्यपूर्ण खेळी करून राष्ट्रवादीची सत्ता स्थापन करणाऱ्या विधान परिषद आमदार संदीप बाजोरिया यांनासुद्धा अनामत कायम राखता आली नाही. या निवडणुकीत सर्वाधिक लोकप्रतिनिधींचा फौजफाटा हा राष्ट्रवादीजवळ होता. मात्र त्यांचा कुठलाही प्रभाव या निवडणुकीतून दिसून आला नाही. काही ग्रामीण भाग वगळता राष्ट्रवादीला मते मिळविण्यासाठी चांगलाच दमखम लावावा लागला. त्यानंतरही केवळ १७ हजार ९०९ इतकी मते बाजोरिया यांना मिळाली. यानंतर मनसेचे भानुदास राजने यांना दोन हजार ३७३, अपक्ष असलेले प्रदीप वादाफळे एक हजार ७०८, कर्मचारी नेते रवींद्र देशमुख एक हजार १८९, ज्ञानेश्वर राठोड ८९०, जगदीश देशमुख ५९०, शेतकरी कामगार पक्षाचे दिलीप मुक्कावार २८०, अशोक शेंडे ४०७, सोपान कांबळे २०३, केशव भागवत २३७, वासुदेव कोकाटे २१५, मनीष ढाले ३६९, प्रशांत राठोड ४५४, राहुल अशोक ठाकरे ४९४, शिवकुमार परचाके ४६९, वसंत कनाके ३४५ मते मिळाली आहे. यातील रवींद्र देशमुख यांच्या मतांच्या आकडेवारीची उत्सुकता सर्वांनाच होती.