शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

मोडक्या घरात पोलीसदादांचा संसार

By admin | Updated: June 3, 2017 00:44 IST

सर्वसामान्य नागरिकांना शांततेचे जीवन जगता यावे, त्यांना गाढ झोप घेता यावी, सर्व सण-उत्सवांचा आनंद घेता यावा

जीर्ण इमारती : सार्वजनिक बांधकामचे दुर्लक्ष, पाईप तुंबले, कुटुंबांचे आरोग्य धोक्यात सर्वसामान्य नागरिकांना शांततेचे जीवन जगता यावे, त्यांना गाढ झोप घेता यावी, सर्व सण-उत्सवांचा आनंद घेता यावा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी वर्षभर रात्रंदिवस कर्तव्य बजाविणाऱ्या पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांच्या राहण्याच्या जागेचा (पोलीस वसाहतींना) पावसाळ्याच्या तोंडावर प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेतला असता आणि पोलीस कुटुंबियांशी चर्चा केली असता भीषण वास्तव समोर आले. सुहास सुपासे । लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : दारव्हा मार्गावरील पळसवाडी परिसरात पोलीस कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. या ठिकाणी ११ इमारती आहेत. प्रत्येक इमारतीत केवळ दोन छोट्या खोल्यांचे १६ फ्लॅट आहेत. एका इमारतीत सरासरी ७० लोकांचे वास्तव्य आहे. म्हणजे अंदाजे ७७० पेक्षा अधिक पोलीस कुटुंबियांचे या ठिकाणी वास्तव्य आहे. परंतु या ठिकाणी या लोकांसाठी कोणत्याही आवश्यक त्या सोयी-सुविधा नाहीत. जीर्ण झालेल्या इमारती पळसवाडी पोलीस वसाहतीतील इमारत क्रमांक एक, दोन व तीन या जीर्ण झालेल्या आहेत. या इमारतींची मागील बाजू पाहल्यास या इमारतीत पोलीस कुटुंबिय राहतातच कसे, असा प्रश्न निर्माण होतो. या तीन इमारतींची मुदत संपली असल्याची माहितीही या परिसरातील नागरिकांनी दिली. अनेक वर्षांपासून रंगरंगोटी नाही या इमारतींच्या देखभालीची जबाबदारी बी. अँड सी. ची आहे. परंतु कोणतीही देखभाल केली जात नाही. कित्येक वर्षात या इमारतींना रंगरंगोटी करण्यात आली नाही. खिडक्यांच्या काचा फुटलेल्या आहेत, अनेक इमारतींच्या स्लॅबमधून पावसाळ्यात गळती लागते, इमारतींमधील वायरिंग तुटलेली आहे, कचरा कुंड्यातील कचरा विखुरला आहे, साफसफाई नियमित होत नाही, या परिसरात झाडे-झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत, सापांचाही मुक्त संचार असतो, अनेक फ्लॅटमध्ये वीज मिटर नाही, त्यामुळे एकाच मीटरवरून धोकायदाकरित्या दोन ते तीन फ्लॅटमध्ये जोडणी देण्यात आली आहे. रस्ते उखडलेले आहेत, पथदिवे बंद आहेत. येथील साफसफाईबाबत गुरुदेव युवा संघानेसुद्धा नगर परिषद प्रशासनाला निवेदन दिले आहे. बी.अँड सी. ची निष्क्रियता या इमारतींची देखभाल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. त्यासाठी ठराविक भाडेही आकारले जाते. परंतु तरीदेखील कोणतीही देखभाल बांधकाम विभागाकडून करण्यात येत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच नगर परिषद या दोन्हींबद्दल प्रचंड रोष दिसून आला. उघडे टाके धोकादायक ड्रेनेजची झाकणे खुली आहेत. सांडपाणी सर्वत्र वाहताना दिसून येते. इमारत क्रमांक आठ मधील संडासच्या टाक्यांचेही झाकण खुले असल्याचे दिसून आले. याच परिसरात असणाऱ्या दक्षता भवनमधील सांडपाणी आणि संडासच्या टाक्यातील पाणी मागच्या एका इमारतीत शिरते. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरलेली दिसून येते. सहाजिकच डासांचाही मोठा उपद्रव आहे. डुकरांचा मुक्त संचार आहेच. संडासचे पाईप चोकअप् झाले असून याबाबत वारंवार तक्रारी करूनही बी. अँन्ड सी. करून कोणतीही दखल घेण्यात येत नसल्याचे सांगण्यात आले. एका पोलीस कर्मचाऱ्याने तीन-चार वेळा स्वखर्चातून डागडुजी केली.