शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

कोळसा कामगारांचे कामबंद

By admin | Updated: January 5, 2015 23:13 IST

कोल इंडिया अंतर्गत वेकोलिसह संपूर्ण चार कंपनीमधील पाच प्रमुख कामगार संघटना विविध मागण्यांसाठी ६ जानेवारीपासून पाच दिवस राष्ट्रव्यापी काम बंद आंदोलन करणार आहे़

वणी : कोल इंडिया अंतर्गत वेकोलिसह संपूर्ण चार कंपनीमधील पाच प्रमुख कामगार संघटना विविध मागण्यांसाठी ६ जानेवारीपासून पाच दिवस राष्ट्रव्यापी काम बंद आंदोलन करणार आहे़ या आंदोलनामुळे वेकोलिच्या १५ खाणींमधील उत्पादन ठप्प पडणार आहे. परिणामी शासनाचे कोट्यधींचे उत्पन्न बुडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.कोल इंडियाअंतर्गत प्रमुख चार कंपन्या आहेत. या सर्व कंपन्या केंद्र शासनाच्या अखत्यारीत येतात. या चारही कंपन्यांमधील कोळसा कामगारांच्या विविध मागण्या गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यासाठी कामगारांनी वारंवार निवेदन दिले. अनेकदा आंदोलनेही केली आहेत. मात्र अद्याप कामगारांच्या समस्या सुटल्या नाहीत. त्यामुळे आता कामगारांचा संयम संपत आहे. त्याच अनुषंगाने आता चारही कंपन्यांमधील पाच प्रमुख कामगार संघटनांनी एकत्रित येऊन ६ जानेवापीरपासून पाच दिवसीय कामबंद आंदोलनाची हाक दिली आहे. कोळसा कंपनीद्वारे खुल्या बाजारात कोळसा विकण्याची परवानगी देण्यात आली आहे. ती समाप्त करावी, अशी कामगारांची मागणी आहे. सोबतच कोळसा ब्लॉक कोल इंडियाला देण्यात यावे, कोल इंडियाचे शेअर विक्री करू नये, कोल इंडियामध्ये ई-अ‍ॅक्शन पध्दत पूर्वीप्रमाणे सुरू ठेवावी, कोळसा विक्री मूल्य उत्पादन खर्चावर आधारित समिती गठित करून पाच प्रमुख कामगार संघटनांचा त्यात समावेश करावा, नवीन कामगार भरती प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच सुरू करावी, रिक्त पदे तातडीने भरावी व कंत्राटदारी, आऊटसोसिंग पध्दत बंद करावी, अशा मागण्या आहेत.याशिवाय नवीन भूमी अधिग्रहण कायदा पूर्ण रूपात लागू करावा, कामगारांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती द्यावी, पदवी, पदविकाधारक, आयटीआय उत्तीर्ण कामगारांना बढती द्यावी, आदी मागण्याही कामगारांनी केल्या आहेत. गेल्या कित्येक महिन्यांपासून या मागण्या सातत्याने करण्यात येत आहेत. मात्र प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. या मागण्यांचे त्वरित निराकरण करावे, अशी कामगारांची अपेक्षा आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आता प्रमुख पाच कोळसा कामगार संघटनांनी कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.यापूर्वी केवळ सन १९८७ मध्ये मोठ्या प्रमाणात कामगारांनी संप केला होता. त्यानंतर आता दुसऱ्यांदा मोठ्या प्रमाणात कामगारांनी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी केंद्रात काँग्रेस आढाडीचे सरकार असताना सतत चार दिवस देशभर कोळसा खाण बंद आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी खुद्द काँग्रेसप्रणीत इंटक ही युनियनही संपात सहभागी झाली होती. त्यावेळी केंद्र सरकारने नमते घेतले होते. मात्र आता सत्ता बदल झाला आहे. त्यामुळे पुन्हा जुनीच परिस्थिती समोर निर्माण झाली आहे.सध्या केंद्रात भाजपा युतीचे सरकार सत्तारूढ आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने ‘सबका साथ- सबका विकास‘, अशी ग्वाही दिली होती. मात्र सत्तेवर येताच केंद्र सरकारने कोळसा कामगारांच्या हिताविरुद्ध कार्य सुरू केल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. त्यामुळेच भाजपाप्रणीत बीएमएस ही कामगार संघटनासुद्धा या देशव्यापी पाच दिवसीय कामबंद आंदोलनात सहभागी होणार आहे. त्यामुळे देशातील सर्व कोळसा गाणींतील कोळसा उत्पादन ठप्प पडणार आहे. परिणामी वीज केंद्रांना कोळसा मिळणे दुरापास्त होणार आहे. त्यामुळे देशात मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे. हे आंदोलन पुढे कोणते वळण घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान सोमवारी मध्यरात्रीच यावर काही तोडगा निघण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)