शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

‘वसंत’वर कामगार धडकले

By admin | Updated: January 6, 2016 03:09 IST

थकीत वेतनाच्या मागणीसाठी पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याचे शेकडो कामगार मंगळवारी दुपारी १२ वाजता कारखान्यावर धडकले.

थकीत वेतन : अध्यक्ष, संचालक मंडळ व कामगारांत तणावउमरखेड : थकीत वेतनाच्या मागणीसाठी पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याचे शेकडो कामगार मंगळवारी दुपारी १२ वाजता कारखान्यावर धडकले. कामगार संघटना आणि संचालक मंडळात कारखाना सुरू करण्याची तयारी असताना या मोर्चाने वातावरण ताणले गेले आहे. वसंत साखर कारखान्याच्या कामगारांचे १२ महिन्यांपासून वेतन थकीत आहे. त्यामुळे कामगारांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासनाने पगार दिला नाही. यासोबतच हंगामी कायम कामगारांच्या हक्काच्या सुट्यांचा पगार, बोनस, सानुग्रह अनुदानाची रक्कम आदी मागण्या प्रलंबित आहेत. कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश पाटील देवसरकर आणि संचालक मंडळ कामगारांच्या पगारावर काहीही बोलायला तयार नाही. पगार देण्यास हेतुपुरस्सर टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे शेकडो कामगार संतप्त झाले. कामगारांनी संघटनेचे अध्यक्ष पी.के. मुडे, व्ही.एन. पतंगराव यांच्या नेतृत्वात मंगळवारी मोर्चा काढला. काही दिवसात गाळप सुरू होणार होते. परंतु मंगळवारी निघालेल्या मोर्चाने पुन्हा एकदा कारखाना प्रशासन आणि कामगारात तणाव वाढला आहे. गाळपाच्या सुरूवातीलाच आंदोलन सुरू झाल्याने ‘वसंत’चे अस्तित्व धोक्यात आले आहे. महिनाभरापूर्वी बॉलर प्रज्वलन झाल्यानंतरही अद्याप गाळपाला सुरूवात झाली नाही. त्यातच कामगारांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. (शहर प्रतिनिधी)वसंत साखर कारखाना सुरू होऊ नये यासाठी विरोधक प्रयत्न करीत आहे. त्यात कामगार संघटना विरोधी नेत्यांसोबत संगणमत करून मला हेतुपुरस्सर बदनाम करीत आहे. कामगारांच्या मागण्या आर्थिक अडचणी असल्यामुळे पूर्ण करू शकलो नाही. मला कारखाना, ऊस उत्पादक आणि कामगारांच्या हितासाठी सुरू करायचा आहे. परंतु कामगारांकडून कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न होत आहे. - प्रकाश पाटील देवसरकर, अध्यक्ष वसंत साखर कारखाना. वसंत साखर कारखाना प्रशासन कामगारांना हेतुपुरस्सर त्रास देत आहे. पगार दिले जात नाही. कारखाना अध्यक्ष आणि संचालक मंडळालाच कारखाना सुरू करायचा नाही. येत्या १० दिवसात कामगारांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर तीव्र आंदोलन छेडणार आहोत. - पी.के. मुडे, अध्यक्ष कामगार संघटना