शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

‘वसंत’चे कामगार धडकले कारखान्यावर

By admin | Updated: January 13, 2015 23:07 IST

गत आठ महिन्यांपासून वेतन न मिळालेल्याने संतप्त झालेले वसंत सहकारी साखर कारखान्याचे कामगार कारखान्यावर धडकले. कारखाना प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊनही दखल घेतली नाही.

थकीत वेतन : संचालक मंडळाबद्दल कामगारांत असंतोष उमरखेड : गत आठ महिन्यांपासून वेतन न मिळालेल्याने संतप्त झालेले वसंत सहकारी साखर कारखान्याचे कामगार कारखान्यावर धडकले. कारखाना प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊनही दखल घेतली नाही. त्यामुळे मंगळवारी दुपारी १२ वाजता कामगारांनी मोर्चा काढून आपला निषेध नोंदविला. वसंत सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू करण्यासाठी जिल्हा बँकेने मोठी रक्कम दिली. तसेच मोलॅसिस (भंगार विक्री), प्रेसमड, येणे वसुली यातून कारखान्याला दरवर्षी रक्कम मिळाली आहे. असे असताना गेल्या पाच वर्षांपासून कामगारांचा पगार थकीत ठेवण्यात येत आहे. यंदा तर गत आठ महिन्यांपासून कामगारांचा पगारच झाला नाही. दर महिन्याला संघटनेच्यावतीने वेतनासाठी निवेदन दिले जाते. परंतु त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे कामगारात असंतोष पसरला आहे. आठ महिन्यांपासून पगार नसल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. दुकानदारही कामगारांना उधारीवर किराणा देण्यास तयार नाही. मुलांच्या शाळा शुल्काचे पैसेही थकीत आहे. आजार पणासाठीही रक्कम नसते. अशा स्थितीत कर्जाचा डोंगर कामगारांवर वाढत आहे. कामगारांच्या परिस्थिती माहिती कारखाना प्रशासनाला माहीत व्हावी म्हणून संघटनेचे पी.के. मुडे, व्ही.एम. पतंगराव यांनी कारखाना अध्यक्षांची भेट घेतली. थकीत पगार व इतर २२ मागण्या त्वरित सोडविण्याची मागणी केली. परंतु अध्यक्षांनी कुठलीही दखल घेतली नसल्याचा आरोप आहे. त्यामुळे मंगळवारी शेकडो कामगार कारखान्याच्या मुख्य कार्यालयावर धडकले. यावेळी कामगारांनी प्रशासनाच्या विरोधात गगणभेदी घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. पोलिसांनीही तगडा बंदोबस्त ठेवला होता. मोर्चा कारखान्यावर आला असता कामगारांचे निवेदन घेण्यासाठी अध्यक्षांसह कुणीही संचालक हजर नव्हते. त्यामुळे कामगारात तीव्र असंतोष पसरला. (शहर प्रतिनिधी)