शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
3
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
4
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
5
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
6
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
7
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
8
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
9
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
10
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
11
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
12
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
13
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
14
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
15
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
16
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
17
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
18
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
19
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
20
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."

‘महसूल’च्या संपाने काम ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 06:00 IST

शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट असून नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागले. महसूल कर्मचाऱ्यांनी सहा टप्प्यात आंदोलन पुकारले आहे. बुधवारी मागण्यांसदर्भात मंत्रालयात चर्चा झाल्यावरही प्रश्न सुटला नाही. त्यामुळे गुरुवारपासून बेमुदत संपाचे हत्यार उपसण्यात आले. राज्यभर सुरू असलेल्या संपाचे तीव्र पडसात जिल्ह्यात उमटले आहे.

ठळक मुद्देकार्यालयात शुकशुकाट : ७०० कर्मचाऱ्यांचा सहभाग, सर्व तालुकास्थळी आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य महसूली कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी गुरुवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. जिल्हाभरातील महसूल कर्मचाºयांनी या संपात सहभाग घेतल्यामुळे संपूर्ण कामकाज ठप्प झाले आहे. शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट असून नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागले.महसूल कर्मचाऱ्यांनी सहा टप्प्यात आंदोलन पुकारले आहे. बुधवारी मागण्यांसदर्भात मंत्रालयात चर्चा झाल्यावरही प्रश्न सुटला नाही. त्यामुळे गुरुवारपासून बेमुदत संपाचे हत्यार उपसण्यात आले. राज्यभर सुरू असलेल्या संपाचे तीव्र पडसात जिल्ह्यात उमटले आहे.नायब तहसीलदार संवर्गाचा ग्रेड-पे ४६०० करण्यात यावा, महसूल लिपिकाचे पदनाम महसूल सहाय्यक करण्यात यावे, महसूल विभागाच्या आकृतीबंधाबाबत दांगट समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करण्यात यावी, गृहविभागाच्या धर्तीवर महसूल कर्मचाऱ्यांची भरती करावी, वर्ग-४ वरून वर्ग-३ वर पदोन्नती करताना तलाठी संवर्गात पदोन्नती करावी, जुनी पेन्शन लागू करावी आदी मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे. यवतमाळ येथे संघटनेचे जिल्हाध्यक्ष यशवंत टाके, राज्य संघटक नंदू बुटे, सुधाकर राठोड, राजू मोट्टेमवार, देवानंद गरड, प्रदीप दुधे, आशिष जयसिंगपुरे, संजय भास्करवार, गोपाल शेलोकार, यामिनी कोरे, अमृता केदार, रोशनी राठोड आदींनी पुढाकार घेतला. यावेळी कर्मचाºयांनी विविध मागण्यांसाठी निदर्शने केली.दारव्हा येथेही संपदारव्हा : महसूल कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे दारव्हा तहसील कार्यालयातील कामकाज ठप्प पडले आहे. यासंपात महसूल कर्मचारी संघटनेचे अशोक निमकर, विनोद शेंदूरकर, सुधाकर राठोड, प्रल्हाद निंबर्ते, महेश साखरकर, भीमराव पाढेण, दीपक मोरे, भूषण पिंपळे, प्रकाश शिरे, प्रशांत माळवी, नवनीत शहाकार, विनोद फोपसे, नितीन जाधव, सचिन देशमुख, अमोल चव्हाण, चेतन चव्हाण, वासुदेव काळबांडे, प्रशांत ढंगारे, मुरलीधर काळे, प्रदीप पाचपोळ, मोरेश्वर राठोड, गणेश लांडे, संतोष इंगोले, रश्मी दरवरे, गंगाबाई देवतळे, यादव गायकवाड, गजानन लोखंडे, विलास टेकाम, सुमित्रा शेळके सहभागी झाले.नेरमध्ये कामाचे तीनतेरानेर : येथेही महसूली कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारल्याने तहसीलमधील कामकाजाचे तीनतेरा वाजले आहे. या संपात संघटनेचे अध्यक्ष वसंत काटगळे, सचिव युवराज अंभोरे, सुधीर राठोड, सुनील जुनघरे, विवेश नलगुंडावार, अमित काटकर, नीलेश बारडे, सुभाष भोरे, सुशील जगताप, रामराव जाधव, अनिल मासाळ, रमेश सरके, राजू देशमुख, विजय काशीकर, डी.ए. गोलाइतकर, प्रतीभा गुल्हाने, पी.डब्ल्यू. पिसाळकर, प्रेमिला वरठी, निर्मला नाईकडा, बेले, राजूरकर, व्ही.एम. गुंडकवार उपस्थित होते.

टॅग्स :Strikeसंप