शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वीज उपकेंद्रांचे काम अर्ध्यावर सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 05:00 IST

राळेगाव परिसराला पांंढरकवडा व यवतमाळातून वीज घेऊन पुरवठा केला जातो. या दोन्ही सेंटरचे लोड कमी करण्यासाठी राळेगाव येथे महापारेषण कंपनीने स्वतंत्र वीज उपकेंद्र उभे केले. सुमारे १५ कोटी रुपये बजेट असलेल्या या उपकेंद्राच्या उभारणीचा कंत्राट नाशिक येथील स्वाती एन्टरप्राईजेस या कंपनीला दिला गेला. मात्र कंपनीचे काम सुरुवातीपासूनच संथ गतीने सुरू होते. शेवटी-शेवटी तर ही कंपनी काम अर्ध्यावर सोडून निघून गेली.

ठळक मुद्देराळेगावातील १५ कोटींचे कंत्राट : तुकड्या-तुकड्यात काम पूर्ण, अमरावतीतून नियंत्रण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्याच्या राळेगाव येथे महाराष्टÑ राज्य वीज महापारेषण कंपनीचे १३२ केव्हीचे उपकेंद्र तयार होत आहे. परंतु कंत्राटदार अर्ध्यावर काम सोडून गेल्याने कंपनीला तुकड्या-तुकड्या हे काम पूर्ण करावे लागत आहे.राळेगाव परिसराला पांंढरकवडा व यवतमाळातून वीज घेऊन पुरवठा केला जातो. या दोन्ही सेंटरचे लोड कमी करण्यासाठी राळेगाव येथे महापारेषण कंपनीने स्वतंत्र वीज उपकेंद्र उभे केले. सुमारे १५ कोटी रुपये बजेट असलेल्या या उपकेंद्राच्या उभारणीचा कंत्राट नाशिक येथील स्वाती एन्टरप्राईजेस या कंपनीला दिला गेला. मात्र कंपनीचे काम सुरुवातीपासूनच संथ गतीने सुरू होते. शेवटी-शेवटी तर ही कंपनी काम अर्ध्यावर सोडून निघून गेली. अखेर शिल्लक काम तुकड्या-तुकड्या वेगवेगळ्या व्यक्तींना देऊन पूर्ण करावे लागले. हे संपूर्ण काम मात्र स्वाती एन्टरप्राईजेसच्याच नावावर लागणार असून तुकड्या-तुकड्यात केलेल्या कामाचा खर्च या कंपनीकडून वसूल केला जाणार आहे.या कंपनीचा स्वत:चा सुपरवायझर किंवा साईड इन्चार्ज कधी दिसला नसल्याचे सांगितले जाते. या कंत्राटदारावर यवतमाळ व कळंब येथील बांधकाम साहित्य व इलेक्ट्रीकल साहित्य खरेदीची उधारीही असल्याचे सांगितले जाते. अखेर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन या उपकेंद्राचे काम पूर्ण करावे लागत आहे. यवतमाळातील उपअभियंता सुटीवर असल्याने अमरावतीचे कार्यकारी अभियंता सुनील शेरेकर यांनी या कामावर देखरेख ठेवली आहे.सद्यस्थितीत १५ कोटींच्या या उपकेंद्राची टेस्टींग झाल्याचे सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात हे उपकेंद्र सुरू झालेले नाही. महावितरण कंपनीचे सहा फिडर राळेगावच्या या उपकेंद्राला कनेक्ट राहणार आहे. मात्र सध्या या फिडरचे काम पूर्ण झालेले नाही. काम पूर्ण झाल्यानंतर उपकेंद्राची पुन्हा ट्रायल घेतली जाणार आहे. दोन-चार दिवसांचे काही काम पूर्ण केल्यानंतर हे उपकेंद्र कार्यान्वित होणार असल्याची माहिती आहे. उपकेंद्र सुरू झाल्यानंतर यवतमाळ व पांढरकवडा उपकेंद्रावरून वीज पुरवठ्याचा भार बºयाचअंशी कमी होणार आहे.जुनेच ट्रान्सफार्मर लावलेनव्या उपकेंद्राला नवे ट्रान्सफार्मर अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात कंत्राटदाराने जुने ट्रान्सफार्मर दुरुस्त करून लावल्याचे सांगितले जाते. या कंत्राटदाराने कामही वेळेत पूर्ण केले नाही.

टॅग्स :electricityवीज