कामे थंडावली : चहांद परिसरातील नागरिकांपुढे पेचराजेश जवादे चहांदशासनामार्फत राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विविध योजना जाहीर करण्यात आल्या आहे. अनेकांना याचा लाभ दिला जात आहे. मात्र मजूर मिळत नसल्याने कामांची गती थंडावली आहे. वैयक्तिक लाभाच्या योजनांचीही परिस्थिती हीच आहे. या स्थितीत योजना पूर्णत्वास जाणार कधी, हा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शेततळे, सिंचन विहिरी, पांदण रस्ते आदी कामे केली जात आहे. पावसाचा जोर ओसरल्यामुळे या कामांना गती देण्याचे प्रयत्न संबंधितांकडून केले जात आहेत. यासाठीची प्रक्रियासुद्धा जवळपास ठिकाणी पूर्ण करण्यात आलेली आहे. परंतु मजूर टंचाई हा प्रश्न सदर योजना राबविण्यात अडथळा ठरत असल्याचे सांगितले जाते. शेतकऱ्यांना सिंचन विहिरींचा लाभ देण्यात आलेला आहे. यासाठीचा काही निधी त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. बहुतांश लाभार्थ्यांनी ही कामे करण्याची तयारीही केली आहे. परंतु आवश्यक तेवढा मजूरवर्ग उपलब्ध होत नाही. शिवाय शेती कामासाठीही मजुरांची टंचाई आहे. विविध प्रकारच्या पिकांवर कीडीचा प्रादुर्भाव झाला आहे. यासाठी विविध प्रकारच्या फवारण्या आवश्यक आहे. त्यामुळे मजुरांची गरज आहे. या व इतर समस्यांमुळे विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. मजूर टंचाईमुळे नरेगाच्यासोबतच शेतीची कामेही खोळंबली आहेत. संबंधित प्रशासनाने मजूर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आहे. नुकसानीच्या सर्वेक्षणाची मागणीपरतीच्या पावसामुळे परिसरातील शेतीपिकांचे नुकसान झाले. कपाशी, ज्वारी, सोयाबीन आदी पिकांची हानी झाली आहे. नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहे. परंतु परिसरात अजून तरी या कार्यवाहीला सुरुवात झालेली नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी या बाबीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आहे.
‘नरेगा’च्या कामासाठी मजुरांचा शोध
By admin | Updated: September 27, 2015 02:08 IST